मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin Care: कोणता साबण किंवा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर? जाहिरातींना बळी पडू नका

Skin Care: कोणता साबण किंवा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर? जाहिरातींना बळी पडू नका

कोणता साबण किंवा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर?

कोणता साबण किंवा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर?

अनेकदा त्वचेसाठी कोणता साबण किंवा बॉडी वॉश योग्य आहे, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे जाहिरातींना बळी पडून आपणही काहीही घेतो. ज्याने फायदा कमी आणि तोटा जास्त होतो.

मुंबई, 10 ऑगस्ट : त्वचेची निगा राखताना (Skin Care) छोट्याछोट्या गोष्टीही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्वचेचा प्रकार कोणता आहे, हे जाणून घेऊन त्यासाठी योग्य उत्पादन वापरता येतं. त्वचेच्या स्वच्छतेसाठी बहुतेक करून साबण वापरला जातो. मात्र, आता बाजारात विविध प्रकारचे बॉडीवॉशही उपलब्ध आहेत. अशा वेळी साबण योग्य की बॉडीवॉश (Body wash) हे ठरवणं अवघड होतं. आपल्या त्वचेनुसार कशाची निवड करावी याबाबत मार्गदर्शन करणारं वृत्त दैनिक जागरणनं प्रसिद्ध केलं आहे.

काही लोकांना साबणाची अ‍ॅलर्जी असते, तर काहींची त्वचा साबणामुळे कोरडी पडते. साबण काय किंवा बॉडीवॉश काय दोन्हीचेही काही फायदे व तोटे आहेत. ते जाणून घेतले, तर आपल्या त्वचेसाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टीची निवड करणं सोपं होईल.

कोरड्या त्वचेसाठी

ज्यांची त्वचा जास्त कोरडी (Dry Skin) आहे. त्यांनी शक्यतो साबणापेक्षा बॉडीवॉशचा वापर करावा. बॉडीवॉशमध्ये हायड्रेटिंग पदार्थ असतात. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते. काही साबणही कोरड्या त्वचेसाठी खास बनवलेले असतात. त्यांचाही वापर करता येऊ शकतो.

नाजूक त्वचेसाठी

नाजूक त्वचा (Sensitive Skin) असणाऱ्यांनी बॉडीवॉशच वापरला पाहिजे. साबणामुळे एकाची अ‍ॅलर्जी दुसऱ्याला होण्याची शक्यता असते. सोरायसिस, अ‍ॅक्ने यांसारखे गंभीर त्वचाविकार असणाऱ्यांनी तर बॉडीवॉशच वापरावा. यामुळे त्याचा प्रसार होऊ शकत नाही. तसंच घरातील इतर लोकही तो बॉडीवॉश वापरू शकतात. साबण घरातील सर्व व्यक्ती वापरतात. त्यामुळे त्वचेची अलर्जी होण्याची शक्यता असते.

खास Festival Tattoo शरीरावर काढण्याआधी हे नक्की वाचा; नाहीतर उद्भवेल मोठा धोका

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेसाठीही (Oily Skin) बॉडीवॉश योग्य ठरतो. कारण यात वापरलेल्या घटकांमुळे त्वचेमधील तेल बाहेर निघून जाण्यास मदत होते. बायोसोपदेखील तेलकट त्वचेसाठी उपयोगी ठरू शकतो. बदाम, मारगोसा आणि खोबरेल तेलाचा वापर केला असेल अशा साबणाचा वापरही तेलकट त्वचेसाठी करता येतो. यासोबत हळदही घालता येते. हळदीतील जीवाणूविरोधी गुणधर्मांमुळे तेलकट त्वचेसाठी त्याचा वापर करता येतो.

मॉइश्चरायजिंग

बॉडीवॉश पातळ असतं, तर साबण घट्ट स्वरूपात असतो. बॉडीवॉशमुळे शरीर मॉइश्चराइज होतं, तर साबणामुळे त्वचा कोरडी पडते. साबण उघड्यावरच ठेवला जातो. त्यामुळे त्याला अनेक हात लागतात. मात्र बॉडीवॉश बंद असतो. त्यामुळे त्याला कोणीही हाताळू शकत नाही.

जीवाणू संसर्ग

त्वचेच्या एखाद्या भागाला जीवाणू संसर्ग (Bacterial Infection) झाला असेल, तर साबणाचा वापर करावा, कारण साबण त्या भागावर व्यवस्थितपणे लावता येतो.

पर्यावरणाच्या रक्षण, संवर्धनाच्या दृष्टीनं विचार करत असाल, तर साबणाची निवडच योग्य ठरेल. कारण बॉडीवॉश प्लास्टिकच्या बाटलीत येतं. त्यामुळे पर्यावरणाला धोका असतो. त्यामुळे साबणच वापरावा.

प्रवासामध्ये नेण्यासाठी बॉडीवॉश हाच योग्य पर्याय ठरतो. कारण ओला साबण ठेवणं सोयीचं नसतं. बॉडीवॉश वापरण्याचे अनेक फायदे असतानाही देशातील बहुसंख्य नागरिक आजही साबणानंच अंघोळ करतात. त्याचं कारण बॉडीवॉश व साबण यांच्या किमतीत असलेला फरक हे आहे. साबणाच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळेच साबणानं अंघोळ करण्याला लोक पसंती देतात.

First published:

Tags: Skin care