चपलांमार्फत coronavirus तुमच्या घरात तर येत नाही ना?

चपलांमार्फत coronavirus तुमच्या घरात तर येत नाही ना?

बहुतेक चपला रबर, प्लास्टिक, चामड्यापासून बनलेले असतात, त्यामुळे त्या कोरोनाव्हायरसचा वाहक ठरू शकतात.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल: कोरोनाव्हायरस (coronavirus) होऊ नये म्हणून तुम्ही सर्व काळजी घेत आहात. घराबाहेर गेल्यावर मास्क लावत आहात, घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धूत आहात, कपडे धुवून घेत आहात, तुमच्याजवळील सर्व वस्तू sanitize करून घेत आहात. मात्र चपलांचं काय? चपलांवरही कोरोनाव्हायरस असू शकतो का?

यूएसमधील पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट केरोल विनर म्हणाल्या, "चपलांमार्फत कोरोनाव्हायरस घरात येतो याबाबत अद्याप काही पुरावे सापडले नाहीत. मात्र काही वस्तूंवर 2 ते 3 दिवस व्हायरस राहतो. त्यामुळे कोरोनाव्हायरस असलेले थुंकीचे शिंतोडे चपलांवर उडाले असतील, तर अशा वस्तूंपासून बनवण्यात आलेल्या चपलांवर व्हायरस असू शकतो. त्याबाबत अधिक अभ्यासाची गरज आहे"

बहुतेक चपला रबर, प्लास्टिक, चामड्यापासून बनलेले असतात, त्यामुळे त्या कोरोनाव्हायरसचा वाहक ठरू शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ एरिझॉनमधील मायक्रोबायोलॉजिस्ट यांनी केलेल्या अभ्यासानुसार, रबर, लेदर आणि पीव्हीसी कंपाउंड यावर सूक्ष्मजीव असू शकतात.

Family practitioner जॉर्जियन न्यानो म्हणाले, "जर गर्दीच्या ठिकाणी शूज घातले गेले, तर ते संसर्गाचा स्रोत ठरू शकतात. जर कोरोनाव्हायरस कोणत्याही ठिकाणी 12 तासांपर्यंत राहू शकतात, तर मग शूजवरही असू शकतात"

संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञ मेरी ई. शेमिथ यांनी सांगितलं, "शूज ज्या मटेरियलपासून तयार केले जातात, त्यावर 5 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस व्हायरस राहू शकतात"

काय खबरदारी घ्याल?

-चपला नेहमी घराबाहेर काढा.

-त्यानंतर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवून घ्या.

-घरात आहे आणि घराबाहेर वापरण्यासाठी वेगवेगळ्या चपला ठेवा.

-घराबाहेर वापरत असलेल्या चपला नियमित स्वच्छ करा.

-ज्या चपला पाण्याने धुणे शक्य नाही, त्या sanitize करा.

मुलांना कोरोनाची घालू नका भीती, असं ठेवा व्हायरसपासून सुरक्षित

Lockdown च्या काळात किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची इम्युनिटी!

First published: April 5, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या