नवी दिल्ली, 15 एप्रिल : गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाला आहे. त्यामुळे फिटनेससाठी (Fitness) व्यायाम अपरिहार्य बनला आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण योगासनं, एरोबिक्स आदी व्यायाम करतात. जिममध्ये दीर्घकाळ वर्कआउट (Workout) करतात. परंतु, वजन कमी झाल्यानंतर त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. तसंच वजन कमी झाल्यावर शरीराच्या काही भागांत चरबी लटकल्यासारखी दिसू लागते. याचा परिणाम एकूणच व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. काही विशिष्ट व्यायामांच्या साह्याने ही समस्या दूर होऊ शकते. `लाइव्ह हिंदुस्थान`ने याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे.
बहुतांश जण वजन नियंत्रणासाठी (Weight Control) व्यायाम करतात. वजन नियंत्रणात आल्यावर शरीराच्या काही भागातली चरबी (Fats) लटकल्यासारखी दिसू लागते. त्यामुळे वजन नियंत्रणात येऊनही व्यक्ती फिट दिसत नाही. ही समस्या विशिष्ट व्यायामांच्या माध्यमातून दूर करता येते. पुशअप्समुळे (Pushups) ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते. पुशअप्स करताना आपले खांदे आणि पायाच्या बोटांखालचा भाग मनगटावर भार देऊन वर उचला. मनगटावर भार देऊन या स्थितीत काही वेळ राहा. त्यानंतर कोपर वाकवून तुमचं शरीर जमिनीच्या दिशेने खाली न्या. शरीर जमिनीपासून सुमारे सहा इंचापर्यंत न्या. हा व्यायाम सात ते आठ वेळा करा.
बारबेल बेंच प्रेस (Barbell Bench Press) हादेखील एक उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम एका बेंचवर पाठीवर झोपा आणि पाय जमिनीला टेकतील अशा पद्धतीनं ठेवा. दोन्ही हातांनी बारबेल पकडा. आता वजन तुमच्या छातीपर्यंत आणण्यासाठी हात कोपरातून वाकवा. सरळ पाहत बारबेल छताच्या दिशेने शरीरापासून दूर न्या. हा व्यायाम 15 ते 20 वेळा केल्यास नक्कीच फरक जाणवेल.
हे ही वाचा-Belly Fat Tips: सुटलेल्या पोटाची चरबी कमी करण्याचा जबरदस्त उपाय; फक्त मेथीचा असा करा उपयोग
डंबेल लॅटरल रायझेस (Dumbbell Lateral Raises) करण्यापूर्वी सर्वप्रथम पायात थोडं अंतर ठेवून उभे राहा. त्यानंतर दोन्ही हातात एक एक डंबेल घ्या. तळहात खालच्या दिशेला ठेवून ते खांद्याच्या रेषेत आणण्यासाठी हात बाजूला करा. या वेळी तुमचं शरीर टी-आकारात असावं. या स्थितीत 2-3 सेकंदं थांबा आणि नंतर हात खाली करा. त्यानंतर हा व्यायाम 20 ते 30 वेळा करावा.
ओव्हरहेड ट्रायसेप्स एक्स्टेंशन (Overhead Triceps Extension) हा व्यायामप्रकारदेखील लटकणारी चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा व्यायाम करताना दोन पायांमध्ये अंतर ठेवून उभं राहा. त्यानंतर दोन्ही हातात एक एक डंबेल घ्या. तुमचे हात वरच्या बाजूला न्या. दंड कानाजवळ आणि तळहात एकमेकांसमोर ठेवा. पाठ सरळ करा आणि डोक्यामागचं वजन कमी करा, जेणेकरून कोपर सुमारे 90 अंश कोनात येईल. ट्रायसेप्स आकुंचित करून हात सरळ करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Health Tips, Weight, Weight gain, Workout