Home /News /lifestyle /

कोरोना साथीत व्हिटॅमिन्सचं अतिसेवनही ठरू शकतं हानीकारक

कोरोना साथीत व्हिटॅमिन्सचं अतिसेवनही ठरू शकतं हानीकारक

तज्ज्ञांच्या मते, शरीरात व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असल्यास कोरोना संसर्ग त्वरित हल्ला करण्यास सक्षम राहत नाही.

  • myupchar
  • Last Updated :
    कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं फार महत्त्वाचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लोक व्हिटॅमिन टॅब्लेट आणि कॅप्सुल घेत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यास कोरोना संसर्ग त्वरित हल्ला करण्यास सक्षम राहत नाही. अशा परिस्थितीत लोक जीवनसत्त्वांचं सेवन वाढवत आहेत, मात्र शरीरात जीवनसत्त्वाची पातळी वाढवण्यासाठी त्याच्या गोळ्या आणि कॅप्सुलचा वापर केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेक रुग्ण भारतातील विविध शहरांमध्ये दिसू लागले आहेत जे जीवनसत्त्वांच्या अत्याधिक सेवनामुळे आजारी आहेत. जीवनसत्त्त्वांचे अधिक सेवन आरोग्यास त्रास देऊ शकते. जीवनसत्त्वांच्या अत्याधिक सेवनामुळे पोटात जळजळ, घसा खवखवणं, थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जीवनसत्त्व पूरक आहार घेणं टाळावं. जीवनसत्त्व ए हे डोळे निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे, मात्र एका संशोधनानुसार शरीरात जीवनसत्त्व एचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांचं नुकसान होतं. बर्‍याच तज्ञांच्या मते, जीवनसत्त्व ए केवळ अन्नाद्वारे घ्यावे.myupchar.com च्या डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की जास्त जीवनसत्त्व ए घेणे हानिकारक आहे. डोकेदुखी, अतिसार, केस गळणे, दृश्य वेदना, कंटाळा, त्वचा खराब होणे, हाडे आणि सांधेदुखी, हृदयाचे नुकसान आणि मुलींमध्ये अकाली पाळी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलेमध्ये गरोदरपणात जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ए घेतल्यामुळे न जन्मलेल्या मुलाचे नुकसान होऊ शकतं हे वाचा - वारंवार लघवीला का होते? समजून घ्या कारणं आणि घरगुती उपाय अमेरिकन हार्ट असोसिएशनने शरीरावर जीवनसत्वे ईच्या परिणामावर संशोधन केले. या संशोधनानुसार ई जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास डोळ्यांचा प्रकाश कमी होऊ शकतो. पदार्थांपासून जीवनसत्त्व ई घेणे धोकादायक नाही. पण जेव्हा डॉक्टरांनी दिलेल्या पूरक आहार पेक्षा अधिक प्रमाणात घेतले जाते तेव्हा त्रास सुरू होतो. जीवनसत्त्व ईच्या अधिकतेमुळे जास्त रक्तस्त्राव आणि थकवा यासह इतर अनेक रोग होऊ शकतात. यामुळे रक्त पातळ देखील होते, म्हणून कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनपूर्वी ते घेऊ नये. हे वाचा - पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा उपाय आणि वेदनांपासून मिळेल आराम जीवनसत्त्व बी 1 च्या अत्यधिक वापरामुळे त्वचेची एलर्जी, झोप येणे, निळे ओठ, छातीत दुखणे आणि श्वसन रोग असे अनेक आजार होऊ शकतात. बी 3 च्या अतिरिक्ततेमुळे पेप्टिक अल्सर आणि त्वचेवर लाल चट्टे येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. बी 6 च्या प्रमाणा बाहेर पोटात कळ येऊन तड गेल्याचा भास देखील होऊ शकतो. गर्भवती महिलेसाठी बी 12 जीवनसत्त्वाचे प्रमाणा बाहेर सेवन चांगले नाही. जीवनसत्त्व बी 12 च्या जास्त वापरामुळे चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेला खाज सुटणे अशे त्रास शरीरास होऊ शकतात. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेण्याचेही तोटे आहेत. हे अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते जे पेशी खराब होण्यापासून वाचवते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जास्त होते ज्यामुळे शरीरात भूक न लागणे, वारंवार लघवी होणे, अशक्तपणा, हृदयविकाराचा धोका इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या शरीरात सुरू होतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - जीवनसत्त्व सी फायदे, खाद्यपदार्थ, स्त्रोत आणि सहप्रभाव न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Vitamin A, Vitamin D

    पुढील बातम्या