मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा उपाय आणि वेदनांपासून मिळेल आराम

पाय मुरगळल्यावर घरच्या घरी करा उपाय आणि वेदनांपासून मिळेल आराम

पाय मुरगळल्यावर औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतो, मात्र यावर प्रभावी असे घरगुती उपचारही आहेत.

पाय मुरगळल्यावर औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतो, मात्र यावर प्रभावी असे घरगुती उपचारही आहेत.

पाय मुरगळल्यावर औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतो, मात्र यावर प्रभावी असे घरगुती उपचारही आहेत.

  • myupchar
  • Last Updated :
जर आपण चालण्यात थोडे निष्काळजी असाल किंवा आपले पाय जमिनीवर व्यवस्थित न टेकवता चालत असाल तर टाच मुरगळणे आणि यानंतर होणाऱ्या वेदना फारच असह्य असतात. वास्तविक पाय आणि तळव्यामधला जोड ही टाच आहे. myupchar.com शी संबंधीत एम्सच्या डॉ. के एम नाधीर यांनी सांगितलं, टाचेच्या वेदना सुरू होताच चालण्यात अस्वस्थता जाणवते, मात्र सामान्य समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्यास अस्वस्थता वाढू शकते. टाच मुरगळल्यास काय काळजी घ्यावी आणि घरगुती उपचारांद्वारे ते कसं बरं करावं हे जाणून घ्या- टाच मुरगळल्यास अशी घ्यावी काळजी
  • टाच सूजणं, टाचेत जास्त वेदना होणं, टाच निळसर होणं आणि चालण्यात अडचण यासारखी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. तीव्र वेदना झाल्यास, पायांचा एक्स-रे देखील केला पाहिजे जेणेकरून योग्य स्थिती लक्षात येऊ शकेल.
  • टाचांमध्ये खूप वेदना होत असेल तर आपण एखादी पेनकिलर खाऊ शकता, मात्र अशा औषधांमध्ये बरेच स्टॅरोईईड्स असतात ज्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून अशी औषधं जास्त प्रमाणात घेऊ नये.
  • टाच मुरगळल्यावर सूज आली असेल तर बर्फाने शेकणं फायदेशीर आहे. जास्त वेदना होत असलेल्या ठिकाणी दिवसातून 15 ते 20 मिनिटं बर्फाने शेका. जर जास्त वेदना होत असतील तर आपण दिवसातून बर्‍याचदा ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करू शकता. तसंच जर तुम्ही हे दोन ते तीन दिवस सातत्याने केलं तर त्याचा लवकरच फायदा होईल.
  • जो पाय मुरगळला असेल त्या पायाला जास्तीत जास्त आराम दिला पाहिजे. पायावर जास्त जोर देण्याचा प्रयत्न करू नये. यावेळी चालणे अस्वस्थता वाढवू शकते.
टाच मुरगळल्यास हे घरगुती उपचार करा myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणाले, टाचेमध्ये वेदना झाल्यास असे बरेच घरगुती उपचार आहेत ज्याद्वारे वेदना कमी करता येतात. औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतोच, मात्र घरगुती उपचार करणे देखील बरेच प्रभावी आहे. कोमट पाण्यात सैंधव मीठ घालून करा उपाय सैंधव मिठामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेट असते. पाय मुरगळल्यास एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक मूठभर सैंधव मीठ घाला आणि त्यात अर्धा तास पाय ठेवा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास फायदा होईल. अळशीचे तेलदेखील आराम देईल अळशीच्या तेलात अल्फा लिनोलिक नावाचं अॅसिड असतं. अळशीच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात घालून त्यात थोडावेळ पाय ठेवल्यास मुरगळलेल्या पायाच्या त्रासापासून आराम मिळतो. सफरचंद व्हिनेगर त्रास निवारण्यात मदत करतं सफरचंद व्हिनेगरचे काही थेंब कोमट पाण्यात घालून त्यामध्ये पाय थोडा वेळ बुडवून ठेवा. ही प्रक्रिया नियमितपणे केल्याने वेदना कमी होतात. हळदीचं दूध पिणं आरामदायक एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन केल्याने टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी-बायोटिक गुणधर्म असतात, म्हणून याचा वापर दुखापत किंवा वेदनांच्या समस्या दूर करते. आल्याचा काढादेखील प्रभावी आल्याचा काढा तयार करण्यासाठी चार वाटी पाणी उकळा, त्यात 2 चमचे आले पूड आणि एक चमचा मध घालून हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा पिण्यास ठेवावे, त्यामुळे देखील त्रासातून आराम मिळेल. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - टाचा दुखणे न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Health, Pain

पुढील बातम्या