जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गरोदरपणात अंडी खाताना या गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्या ऐवजी होईल नुकसान

गरोदरपणात अंडी खाताना या गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्या ऐवजी होईल नुकसान

गरोदरपणात अंडी खाताना या गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्या ऐवजी होईल नुकसान

गरोदरपणात महिलांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. काय खावे, काय खाऊ नये याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. गरोदरपणात अंडी खाताना काय काळजी घ्यावी याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 डिसेंबर : गरोदरपणात स्त्रियांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात स्त्रिया जे खातात त्याचा थेट परिणाम त्यांच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर होत असतो. अनेक खाद्यपदार्थ असे असतात जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात, परंतु या काळात स्त्रियांना ते पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु गरोदरपणा त अंडी खाणे चांगले मानले जाते. आज आपण गरोदरपणात अंडी खाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. अंड्यांमध्ये प्रोटिन्सव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12, ओमेगा-3, कॉपर, मॅग्नेशियम आणि सेलेनियम असे अनेक पोषक घटक असतात. यामुळे गरोदरपणात अंडी खाऊन तुम्ही आरोग्याची काळजी सहज घेऊ शकता. परंतु गरोदरपणात अंडी खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हरजिंदगीच्या रिपोर्टमध्ये आहारतज्ज्ञ रितू पुरी यांनी गरोदरपणात अंडी खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

Mushroom In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये मशरूम खाणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कच्चे अंडे खाणे टाळावे गरोदरपणात कधीही कच्चे खाऊ नये. तुम्ही अंड्यांपासून विविध डिश बनवून खाऊ शकता. परंतु कच्चे अंडे चुकूनही खाऊ नका. कच्चे अंडे खाल्ल्यास गर्भपाताचा धोका असतो. तसेच यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

News18लोकमत
News18लोकमत

घरी बनवलेले पदार्थ खा गरोदरपणात कधीही अंड्यापासून बनवलेलेले बाहेरचे पदार्थ खाऊ नका. केवळ घरी बनवलेले पदार्थ खावे. बाहेरील पदार्थांमुळे तुमच्या गर्भाला आणि आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे घरीच अंड्यापासून बनवलेले पदार्थ खावे यामुळे तुमचे आणि तुमच्या आणि बाळाचे आरोग्य चांगले राहील. सकाळी खा अंडी गरोदरपणात शक्यतो नाश्त्यात अंडी खाण्याचा प्रयत्न करा. कारण या काळात शरीराची चयापचय क्रिया खूप तीव्र असते. त्यामुळे सकाळी अंडी खाल्ल्याने अपचनाची समस्या होत नाही आणि त्याचा तुमच्या शरीराला अधिक लाभ होतो. प्रमाणात खा अंडी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. गरोदरपणात अंडी खाल्ल्याने फायदा होतो. परंतु ते मर्यादित प्रमाणातच खावे. दिवसातून दोन ते तीन अंडी खाऊ शकता, परंतु त्यापेक्षा जास्त अंडी खाणे टाळावे. जास्त अंडी खाल्ल्याने तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. Pregnancy Tips : गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर या लेखातून असे दिसून येते की गरोदरपणात अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु त्यांचा नियमित आहारात समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या गर्भातील बाळाच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात