मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घराघरात बनणारा मराठमोळा खास पदार्थ आहे Immunity Booster; ऋजुता दिवेकर यांच्या सोप्या टिप्स

घराघरात बनणारा मराठमोळा खास पदार्थ आहे Immunity Booster; ऋजुता दिवेकर यांच्या सोप्या टिप्स

सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकरचा फिटनेस मंत्रा

सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकरचा फिटनेस मंत्रा

बॉलिवूड सेलिब्रटींची फिटनेस ट्रेनर फेमस न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) ऋजुता दिवेकर यांनी इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी घराघरात होणारा एक खास आणि सोपा पदार्थ फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.

दिल्ली, 10 मे: कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी काय खावं? असा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे. कोणती औषधं, फळ, भाज्या किंवा कोणते पदार्थ फायदेशीर ठरतील ? याचा विचार आपण करतो. इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणतंही औषध घेण्याची गरज नाहीये. घरातच बनणारे असे पदार्थ आहेत जे इम्युनिटी वाढवतात.

बॉलिवूड सेलिब्रटींची फिटनेस ट्रेनर फेमस न्युट्रिशनिस्ट (Nutritionist) ऋजुता दिवेकर यांनी इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी घराघरात बनणारा एक खास आणि सोपा पदार्थ फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणजे शिरा. हा पदार्थ पूजेचा प्रसाद म्हणून हमखास बनवला जातो. साजूक तुपातला शिरा करतानाच घरभर घमघमाट सुटतो. शिरा बनतानाच तो कधी खायला मिळतो याची वाट सगळेचं पाहतात. शिऱ्याची चव तर अप्रतिम असतेच, पण शिरा परफेक्ट इम्युनिटी बूस्टर असल्याचं ऋजुता दिवेकर सांगतात.

(भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच? WHO नेसुद्धा व्यक्त केली चिंता)

ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram Account)वर शिऱ्याचा फोटो शेअर केलेला आहे.

(Gadchiroli: तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 2 महिलांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू)

त्या म्हणतात नेहमीच आजारी माणसासाठी घरात बनणारा शीरा इम्युनिटी बुस्टर (Immunity Booster) असतो. यामधून न्युट्रीशनही मिळतात.शिरा बनवताना तो लोखंडाच्या कढईत बनवावा म्हणजे लोह (Iron) मिळते. शिवाय शिऱ्यामध्ये तूप, ड्रायफ्रुट,केसर,साखर यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. त्यामुळे आजारी माणसाची भूक वाढते.

ऋजुता दिवेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पूजेचा प्रसाद म्हणून घराघरात शिरा बनवला जातो. वातावरणात होणाऱ्या बदलानुसारच पूजेचं आयोजन केलं जातं. जसं श्रावण, मार्गशीर्ष महिन्यात पूजा घातली जाते. त्यासाठी प्रसाद म्हणून शिरा केला जातो. तो या बदलेल्या वातावरणात रोग प्रतिकारशक्ती वाढवतो. परफेक्ट शिरा कसा करायचा.. पाहा कृती -

(शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत; गावातील 10 गायींचा मृत्यू, तर 30 हून अधिक बेपत्ता)

1 कप रवा, 1 कप साखर, 4 कप पाणी, एक चिमूट केशर, 5 वेलची, 1 कप तूप हे साहित्य शिरा बनवण्यसाठी लागतं.

शीरा बनवण्याची कृती

लोखंडाची कढई घ्या. ती गरम झाल्यावर त्यात तूप घाला. तूप वितळल्यावर त्यात रवा घाला. मंद आचेवर भाजा. त्याचवेळी दुसऱ्या भांड्यात पाणी आणि साखर उकळायला ठेवा. रवा चांगल्या गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजा. त्यानंतर भाजलेल्या रव्यामध्ये हा गरम पाक घाला. त्याचवेळी वेलची आणि केशरही घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर पाणी आटेपर्यंत शिजवा. सर्व करताना ड्रायफ्रुट घाला.

First published:

Tags: Fitness, Health Tips, Immun, Superfood