मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता पासपोर्ट काढण्याची कटकट विसरून जा; सोपी ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या

आता पासपोर्ट काढण्याची कटकट विसरून जा; सोपी ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या

 गेल्या काही वर्षांत पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन (Online) झाली आहे. पासपोर्टसाठी आता ऑनलाइन अर्ज करता येतो. पासपोर्टसाठीची ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोपी आणि सुटसुटीत आहे. कशी आहे ही  प्रक्रिया जाणून घ्या.

गेल्या काही वर्षांत पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन (Online) झाली आहे. पासपोर्टसाठी आता ऑनलाइन अर्ज करता येतो. पासपोर्टसाठीची ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोपी आणि सुटसुटीत आहे. कशी आहे ही प्रक्रिया जाणून घ्या.

गेल्या काही वर्षांत पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन (Online) झाली आहे. पासपोर्टसाठी आता ऑनलाइन अर्ज करता येतो. पासपोर्टसाठीची ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोपी आणि सुटसुटीत आहे. कशी आहे ही प्रक्रिया जाणून घ्या.

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : परदेशात प्रवास (Foreign Trip) करण्यासाठी आपल्या देशाचा पासपोर्ट (Passport) असणं गरजेचं आहे. शासकीय कामांसाठीदेखील पासपोर्ट गरजेचा असतो. गेल्या काही वर्षांत पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन (Online) झाली आहे. पासपोर्टसाठी आता ऑनलाइन अर्ज करता येतो. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पुढच्या प्रक्रियेच्या टप्प्यांची माहिती दिली जाते. पासपोर्टशी निगडित सर्व सेवा ऑनलाइन झाल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे. पासपोर्टसाठीची ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोपी आणि सुटसुटीत आहे. `इंडिया डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. परदेश प्रवासासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. परदेशात शिक्षण, तीर्थयात्रा, पर्यटन, व्यावसायिक उद्देश, वैद्यकीय उपचार किंवा कुटुंबातील व्यक्तींना भेटणं यांपैकी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी जायचं असेल, तर संबंधित व्यक्तीकडे भारत सरकारने जारी केलेला अधिकृत पासपोर्ट असणं गरजेचं आहे. परदेशात प्रवासासाठी जायचा विचार असेल आणि तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर एका सोप्या ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. हेही वाचा - Amazon-Flipkart-Myntra Sale : सुरू होतायत Festival sale; फसवणुकीचा धोका, अशी करा स्मार्ट Online shopping पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. यासाठी सर्वप्रथम पासपोर्ट सेवेच्या portalindia.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर जावं. पोर्टलच्या होम स्क्रीनवरच्या Register Now या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यावर पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर जाऊन नोंदणीकृत आयडीच्या (ID) मदतीने लॉगिन करावं. त्यानंतर नवा पासपोर्ट किंवा पासपोर्ट री-इश्यूसाठी (Reissue) अर्ज करण्याकरिता असलेल्या बटणावर क्लिक करावं. फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून तो सबमिट करावा. त्यानंतर तुम्हाला View Saved/Submitted Applications हा ऑप्शन दिसेल तो ओपन करावा. आता सेवेसाठी किमान शुल्क भरण्याकरिता पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करावं. सर्व पीएसके/पीओपीएसके/पीओमध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी शुल्क अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी नियमित अर्ज शुल्क 1500 रुपये, तर तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज शुल्क 2000 रुपये आहे. तुम्ही नेट बॅंकिंग किंवा अन्य पर्यायाद्वारे हे शुल्क भरू शकता. त्यानंतर त्याच्या पावतीची प्रिंट मिळवण्यासाठी अर्ज पावती प्रिंट या लिंकवर क्लिक करावं. तुम्हाला हा अर्ज भरल्यानंतर नियु्क्ती तपशीलासह एक एसएमएस (SMS) येईल. पासपोर्ट कार्यालयात पुरावा म्हणून हा मेसेज दाखवावा लागतो. अर्ज भरतेवेळी जी कागदपत्रं तुम्ही जमा केली आहेत, त्यांच्या मूळ प्रती घेऊन तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयामध्ये (RPO) जावं लागेल. गेल्या काही वर्षात भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पासपोर्टशी संबंधित सेवांच्या मागणीत वाढ झाली आहे. म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) 2010 मध्ये पासपोर्ट सेवा प्रकल्प अर्थात पीएसपी सुरू केला. यामुळे पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करण्याची आणि जारी करण्याची प्रक्रिया सुलभ झाली. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक पोलिसांकडून दस्तऐवज आणि प्रत्यक्ष व्यक्तीच्या पडताळणीचादेखील समावेश आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट थेट अर्जदाराच्या अधिकृत पत्त्यावर पाठवला जातो.
First published:

Tags: Lifestyle, Passport

पुढील बातम्या