मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त कोरोनाच नव्हे तर 2021 मध्ये आणखी एक महाभयंकर संकट; भविष्याबाबत खळबळजनक दावा

फक्त कोरोनाच नव्हे तर 2021 मध्ये आणखी एक महाभयंकर संकट; भविष्याबाबत खळबळजनक दावा

फक्त कोरोनाची तिसरी लाट नव्हे तर आणखी एका संकटाचा सामना या वर्षात करावा लागणार आहे.

फक्त कोरोनाची तिसरी लाट नव्हे तर आणखी एका संकटाचा सामना या वर्षात करावा लागणार आहे.

फक्त कोरोनाची तिसरी लाट नव्हे तर आणखी एका संकटाचा सामना या वर्षात करावा लागणार आहे.

मुंबई, 07 जून : 2020 साल... संपूर्ण वर्ष कोरोनातच गेलं. 2021 सालाच्या सुरुवातीला कोरोनातून थोडासा दिलासा मिळाला. कोरोनाची पहिली लाट (Coronavirus wave) ओसरली. इतक्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) उसळली. या लाटेसह आलं ते फंगसचं संकट. आता तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही (Corona thired wave) धोका असल्याचं सांगितलं जातं आहे. आता हे वर्षसुद्धा कोरोनातच संपणार हे निश्चित धरून तुम्हीसुद्धा आता मनाची तयारी केली असेल. पण 2021 या वर्षात फक्त कोरोनाच नाही, तर आणखी एक महाभयंकर संकट आहे, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

या वर्षात आणखी काय काय वाढून ठेवलं आहे? अशी चिंता प्रत्येकालाच वाटते आहे. भविष्यातील याच संकटाचं उत्तर सापडलं आहे. जगात असे काही लोक आहेत, जे टाइम ट्रॅवल (Time Travel) केल्याचा म्हणजे भविष्यातून परत आल्याचा दावा करतात. त्यांच्याकडे त्याबाबत काही पुरावा नसतो, त्यामुळे त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पण सध्या परिस्थिती अशी आहे की, प्रत्येकाला भविष्यात काय होणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. याचदरम्यान तीन मित्रांनी भविष्याबाबत एक मोठा दावा केला आहे. आपण भविष्यातून परत आलो आहोत आणि येणारा कालावधी हा चांगला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - झोप लागताच दिसतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात रहस्यमयी आजाराची दहशत

या तिन्ही मित्रांनी टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ अपलोड केला आहे आणि अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी सांगितलं की, येणारा काळ हा खूप भयंकर घटनांनी भरलेला आहे. काही फिक्शनल फिल्म आणि डॉक्युमेंट्री फिल्म्समधील क्लिप्स वापरून त्यांनी एक व्हिडीओ तयार केल आहे.

या टाइम व्लॉगरनी (Time Vlogger)  दावा केला आहे की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ते पृथ्वीवर आले. त्यांनी जे पाहिलं ते लोकांना सांगून सर्वांचा जीव त्यांना वाचवायचा आहे. 2021 मध्ये फक्त कोरोना हे एकमेव संकट नाही. तर तापमानात समुद्रातील उंच लाटा थैमान घालणार आहेत. काही दिवसांतच सर्वकाही उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होईल. याशिवाय त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही. दरम्यान हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आणि याबाबत अधिक माहिती मागितली.

हे वाचा - चांगल्या कामासाठी जाताना खा दही-साखर? हे आहे त्यामागचं शास्त्रीय कारण

याआधीसुद्धा एका व्यक्तीने टिकटॉकवर भविष्यवाणी केली होती. 6 ऑक्टोबर, 2021  ला एक विचित्र प्राणी जगात दिसेल. हा जीव ऑस्ट्रेलियातील जंगलात सापडेल. तो 2582 मधून परतला आहे, असा दावा त्याने केला आहे. यानंतर या टिकटॉक युझर्सचे फॉलोअर्स वाढले होते.

सोशल मीडियावर असे बरेच खळबळजनक दावे केले जात असतात. त्यांना कोणत्याही पुराव्यांचा आधार नसतो. त्यामुळे ते किती खरे ठरतील हे येणाऱ्या कालावधीतच समजेल.

First published:

Tags: Corona, Coronavirus, World news