पुनीत माथुर, प्रतिनिधी जोधपूर, 20 जून : बिपरजॉय वादळाच्या दरम्यान, एक अशी बातमी समोर आली, जी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल.या धोकादायक चक्रीवादळामुळे पश्चिम राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस झाला. पण याचदरम्यान, जोधपूरमधील खाद्यप्रेमींनी एक कोटी किमतीच्या मोठ्या मिरच्या खाल्ल्याचा दावा केला जात आहे. येथील मोठ्या दुकानांमध्ये सकाळपासूनच दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि एक कोटी रुपये किमतीच्या या वडा मिरच्यांची विक्री झाली आहे. जोधपूर शहरात इतर जिल्ह्यांपेक्षा कमी पाऊस झाला. पण बिपरजॉय वादळाचा प्रभाव पश्चिम राजस्थानमध्ये सर्वाधिक दिसून आला. तर जोधपूर येथे वातावरण आल्हाददायक राहिले. 4 ते 5 दिवस आकाशात ढगाळ वातावरण राहिले आणि पाऊसही पडला. त्यात खाण्याचे शौकीन असलेल्या या शहरातील लोकांनी आल्हाददायक वातावरण आणि पावसात एक कोटी रुपयांच्या वडा मिरच्या खाल्ल्या.
जोधपूरमध्ये बनवलेला मिर्ची वडा नमकीन असतो. 70 मसाले वापरुन हा मिरजी वडा तयार केला जातो. जोधपूरमध्ये काही मिठाईची दुकाने आहे जे इतके प्रसिद्ध आहे की या पावसाळ्यात मिर्ची वडा खाण्यासाठी लोक रांगेत उभे असलेले दिसले. 4 ते 5 पट जास्त विक्री - जोधपूरमध्ये मिर्ची बडा अत्यंत स्वादिष्ट पद्धतीने तयार केली जाते. ती खाण्यासाठी विशेष पावसाळ्यात लोक नक्कीच घराबाहेर पडतात. त्यामुळेच या हंगामात मिठाईवाल्यांनी चांगलीच कमाई केली आहे. कारण रोजच्या तुलनेत 4 ते 5 पटीने जास्त विक्री झाल्याने या हंगामात मिठाईच्या दुकानांच्या व्यवसायाला नवी चालना मिळाली आहे.
परदेशातही मागणी जोधपूरचा मिर्ची वडा जगभर प्रसिद्ध आहे. पूर्वी मिर्ची वडा थार एक्स्प्रेसने पाकिस्तानला पाठवले जात होते, पण आता ऑनलाइन व्यवसाय सुरू झाल्यानंतर जगभरातील मिर्ची वडाचे शौकीन असलेले लोक ऑर्डर करुन मागवतात आणि जोधपूरमधून अनेक देशांना हा मिर्ची वडा पावठला जात आहे. बिपरजॉयच्या आपत्तीने जोधपूरच्या मिठाईच्या दुकानांचा चांगला व्यवसाय झाला आहे. जोधपूर शहरातील जनता स्वीट होम, परिहार स्वीट होम, सूर्या नमकीन पोकर स्वीट होम आणि अरोरा स्वीट होमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा दिसत होत्या.