युगांडामध्ये मलेरियाच्या रूग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते त्यात लोकांना या रोगाची लागण झपाट्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे.
आफ्रिकेत या नव्या रोगाचा उदय होणं ही जगासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. आधीच जगभरात कोरोना विषाणूमुळे लोकांना साथरोगाचा सामवा करावा लागत आहे.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (New England Journal of Medicine) बुधवारी प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे की हा रोग आता संपूर्ण आफ्रिकेसह जगभरात पसरू शकतो.
डासांमुळे मलेरिया पसरतो. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आफ्रिकेत मलेरियामुळे दरवर्षी 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. 5 वर्षांखालील मुले आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका असतो.