मुंबई : आपल्याला हे माहित आहे आणि डॉक्टर देखील नेहमी सांगत असतात की पाणी हे शरीरासाठी खुपच चांगलं आणि महत्वाचा घटक आहे. चांगल्या आरोग्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळेच लोकांना दररोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असे काही लोक आहेत जे रात्री झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पितात. त्यांना असे वाटते की यामुळे त्यांचं शरीर हायड्रेट राहिल आणि त्यांना त्रास होणार नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार ही एक चांगली सवय आहे. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? पण तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी सावधगिरीने पाणी प्यावे. चूक केल्याने शरीराच्या काही भागात सूज येऊ शकते. नोएडाच्या डाएट मंत्राच्या संस्थापक डायटीशियन कामिनी सिन्हा यांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी लगेच पाणी पिणे फायदेशीर नाही. साधारणपणे लोकांनी झोपण्याच्या १ तास आधी पाणी प्यावे. झोपण्यापूर्वी दूध पिणे फायदेशीर आहे. दूध प्यायल्याने तुम्हाला प्रोटीन मिळते, जे झोपताना तुमच्या शरीराला फायदेशीर ठरते. जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता, परंतु तुम्ही तहान न लागता जबरदस्तीने पाणी पिऊन झोपणे टाळावे. जास्त पाणी प्यायल्यानंतर झोपल्यास चेहऱ्यावर आणि हात-पायांवर सूज येऊ शकते, याला वॉटर रिटेन्शन किंवा एडेमा म्हणतात. बद्धकोष्ठता असलेल्या रुग्णांनी हे करावे डायटीशियन कामिनी सांगतात की बद्धकोष्ठतेचा त्रास असलेले लोक झोपण्यापूर्वी थोडे पाणी पिऊ शकतात. मात्र, त्यांनी सकाळी उठून रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्यावे. यामुळे त्यांना समस्येपासून आराम मिळेल आणि पचनक्रिया सुधारेल. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की लोकांनी दररोज किमान 2-3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे, जेणेकरून ते हायड्रेटेड राहतील आणि निर्जलीकरणाची समस्या उद्भवणार नाही. पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे आणि उन्हाळ्यात ते अधिक महत्वाचे होते. किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी पाणी खूप फायदेशीर आहे.
तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो. बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येने त्रस्त असलेले लोक रात्री एक ग्लास कोमट दूध घेऊ शकतात. यामुळे थकवा दूर होतो आणि चांगली झोप लागते. आयुर्वेदातही रात्रीची वेळ ही दूध पिण्यासाठी सर्वात फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.