मुंबई, 4 जुलै : तुम्ही अनेकदा जेवणात दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र खाल्ल्या असतील. विशेषत: लोक दुधापासून बनवलेली मिठाई, जेवणानंतर किंवा जेवणासोबत खातात. ही गोष्ट खूपच सामान्य आहे. या पदार्थांमुळे आपल्या जेवणाची मजा अजून वाढते. परंतु आयुर्वेद (Ayurveda) दुधापासून बनवलेले पदार्थ सर्व प्रकारच्या जेवणासह खाण्याच्या कल्पनेचं अजिबात समर्थन करत नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही मांसाहार करत असाल त्यावेळी ते टाळणं उत्तम. आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र किंवा लगेच खाण्यास सक्त मनाई केली आहे. हे हानिकारक (Harmful Food Combinations) मानले जाते. याच्या सेवनामुळे तुम्हाला पचन आणि त्वचेशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.
चिकन खाल्ल्यानंतर दूध पिऊ शकतो का? (what is a diet against)-
आयुर्वेद डॉक्टर नितिका कोहली स्पष्ट करतात की, आयुर्वेदानुसार विविध पदार्थांचं सेवन वेगळ्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. आरोग्य बिघडू नये म्हणून योग्य वेळी किंवा अंतराने योग्य प्रकारचे मिश्रण खाणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, कफ, वात आणि पित्त या तीन दोषांचे असमतोल हे त्याचे प्राथमिक कारण आहे, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे त्या सांगतात.
विरोधी आहार काय आहे? (What is contrast Diet?)-
आयुर्वेदानुसार, कॉन्ट्रास्ट डाएट म्हणजे अशा अन्नपदार्थांचे मिश्रण, जे एकत्र खाल्ले तर शरीरावर विपरीत परिणाम होतो. असे पदार्थ आपल्या आहारात दीर्घकाळ समाविष्ट केल्याने अंधत्व, वेडेपणा, नशा, अशक्तपणा, त्वचारोग, नपुंसकता आणि वंध्यत्व यांसारखे आजारही होऊ शकतात.
आयुर्वेदाचे प्रख्यात महर्षी आणि आयुर्वेद विशारद चरक यांनीही या मुद्द्याचे समर्थन केले आहे आणि सांगितले आहे की, जर अन्नाच्या विरूद्ध अन्न दीर्घकाळ खाल्ले तर काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.
या गोष्टी एकत्र खाण्याची चूक करू नका (Do not make the mistake of eating these things together)-
मासे + दूध
चिकन + दूध
चहा + लसूण
दूध + केळी
डाळिंब + द्राक्ष
हिरवे टोमॅटो + वाइन
बटाटा + दारू
दूध + मीठ
हेही वाचा- सावधान! जास्त चॉकलेट खात असाल तर वेळीच घ्या काळजी, नाहीतर ‘या’ समस्यांना पडाल बळी
चिकन आणि दूध एकत्र का खाऊ नये? (Why shouldn't chicken and milk be eaten together?)-
डॉक्टर कोहली यांनी नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले आहे की चिकनसह (किंवा इतर कोणतेही मांसाहारी अन्न) दूध एकत्र करणे ही योग्य नाही, कारण दुधाची पचन प्रक्रिया चिकनपेक्षा वेगळी आहे. दूध आणि चिकन एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. दुसरीकडे, काही लोकांसाठी चिकन पचायला जड असते, ज्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
चिकन आणि दूध एकत्र खाल्ल्यास काय होते? (What happens if you eat chicken and milk together)-
आयुर्वेदाचे डॉक्टर सांगतात की, या मिश्रणाच्या सेवनाने शरीरावर दीर्घकाळ विपरीत परिणाम दिसू लागतात. या परिणामांमध्ये पोटाशी संबंधित समस्या जसे की पोटदुखी, मळमळ, अपचन, गॅस, गोळा येणे, अल्सर, दुर्गंधी, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि अनेक गंभीर त्वचा विकार यांचा समावेश होतो.
चिकन खाल्ल्यानंतर दूध कधी प्यावे? (When to drink milk after eating chicken)-
तज्ज्ञ चिकन आणि दूध स्वतंत्रपणे आणि 2 तासांच्या अंतराने ठेवण्याची शिफारस करतात. निरोगी आहार म्हणजे विषारी किंवा हानिकारक पदार्थांपासून दूर राहणे किंवा जीवनशैलीचा चांगला मार्ग सुनिश्चित करण्यासाठी अन्न संयोजन करणं होय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayurved, Chicken, Dangerous milk combinations, Milk combinations