मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दातदुखीमुळे चावणंही अशक्य; असे पदार्थ जे भूकही शमवतील आणि वेदनेपासून देतील मुक्ती

दातदुखीमुळे चावणंही अशक्य; असे पदार्थ जे भूकही शमवतील आणि वेदनेपासून देतील मुक्ती

तुम्हीही दातदुखीनं (toothache) हैराण असाल मात्र खूप भूक लागली आहे आणि वेदनाही थांबत नाहीत तर मग हे घरगुती उपाय करून पाहा.

तुम्हीही दातदुखीनं (toothache) हैराण असाल मात्र खूप भूक लागली आहे आणि वेदनाही थांबत नाहीत तर मग हे घरगुती उपाय करून पाहा.

तुम्हीही दातदुखीनं (toothache) हैराण असाल मात्र खूप भूक लागली आहे आणि वेदनाही थांबत नाहीत तर मग हे घरगुती उपाय करून पाहा.

  • myupchar
  • Last Updated :
दात दुखणं खूप वेदनादायक असतं. दातदुखीमुळे दिवसभर त्रास होतो. यामुळे बोलणं, खाणं, पिणं यावरही परिणाम होतो. कधीकधी डोकं, जबडा आणि कानापर्यंत वेदना जातात. सूज आणि फोड येण्याचे त्रास देखील होतात. myupchar.com चे डॉ. राजी अहसन म्हणतात की, दातांच्या बाह्य थरात कमकुवतपणा, दातांची संवेदनशीलता, अक्कल दाढ, हिरड्याचे रोग, अयोग्यरित्या ब्रश करणं किंवा गुळण्या करणं, संक्रमित दात आणि दुखापत यामुळे दातदुखी होते. दंत चिकित्सा प्रक्रियेसह आणि औषधांव्यतिरिक्त असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे वेदना कमी करता येऊ शकतात. त्यातील एक मार्ग म्हणजे विशिष्ट पदार्थांचे सेवन करणे. दातदुखीच्या वेदनांमध्ये काही गोष्टी टाळल्या पाहिजेत,. असेही काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन या समस्येस आराम देतं. तसंट दातदुखीमध्ये मऊ पदार्थांचं सेवन केलं जाऊ शकतं कारण यामुळे हिरड्या आणि दात दुखत नाहीत आणि दातांची संवेदनशीलता वाढणार नाही. कुस्करलेला बटाटा दातदुखीनं ग्रस्त लोकांसाठी उकडलेले बटाटे फायदेशीर ठरतील. बटाटे शिजल्यावर मऊ होतात आणि ते कुस्करून खाल्ल्यास दातांसाठी त्रासदायक नसतात. त्यात विविध चटपटीत मसाले घालून एक उत्तम आहार बनवता येतो. तसंच पोटही भरतं. आइस्क्रीम दंतवैद्य बहुतेकदा दंत प्रक्रियेनंतर आइस्क्रीम खाण्यास सांगतात. हा एक चांगला पर्याय आहे जो वेदनांच्या दरम्यान स्वीकारला जाऊ शकतो. आईस्क्रीम चावण्याची गरज नाही आणि ती आपण आरामात खाऊ शकतो. मिल्कशेक दातांच्या मुळांवर घाव असल्यावर आपल्या आवडत्या पदार्थांचे मिल्कशेक्स बनवून सेवन करा, कारण यामुळे शरीराला आवश्यक पौष्टिक घटकही मिळतील आणि चावण्याची गरज नाही. सूप सूप देखील एक चांगला पर्याय असू शकतो जे चावण्याची गरज नसते. भाज्या, कोंबडी किंवा मासे यांच्या सूपचं सेवन केलं जाऊ शकतं. पण हे सूप गरमागरम नाही तर थंड करून प्या. दही, पनीर आणि दूध दातदुखी आल्यावर दुग्धजन्य पदार्थ त्यास आराम देतात. दूध आणि दही सहजतेने खाऊ शकता आणि शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतील. सँडविच जर भूक भरपूर लागली असेल आणि दातदुखी असह्य झाली असेल तर सँडविच खाणं हा एक चांगला पर्याय आहे. मऊसर सँडविच खाल्ल्यानं दातदुखी वाढणार नाही. मऊ ब्रेड सह आपण सँडविचमध्ये पनीर,चीज, अंड्याचे तुकडे, शेंगदाण्याचा मस्का इत्यादींचा समावेश करू शकता. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - दात दुखी: लक्षणे, कारणे, उपचार... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Health, Pain

पुढील बातम्या