Home /News /lifestyle /

Relationship Tips: कोणत्याही रिलेशनशीपमध्ये या गोष्टी अजिबात सहन करू नका; ही काही अ‍ॅडजस्टमेंट नव्हे

Relationship Tips: कोणत्याही रिलेशनशीपमध्ये या गोष्टी अजिबात सहन करू नका; ही काही अ‍ॅडजस्टमेंट नव्हे

काही ना काही बाबतीत तुमची विचारसरणी तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळी असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे, परंतु अ‍ॅडजस्टमेंटव्यतिरिक्त, काही गोष्टी आहेत ज्या अ‍ॅडजस्टमेंट करणं किंवा सहन करणं कोणासाठीच चांगले नाही.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 06 मार्च : नात्यात अ‍ॅडजस्टमेंट (Adjustment in Relationship) करावी लागते, कारण दोन लोकांची विचारसरणी कधीच सारखी असू शकत नाही. काही ना काही बाबतीत तुमची विचारसरणी तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळी असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे, परंतु अ‍ॅडजस्टमेंटव्यतिरिक्त, काही गोष्टी आहेत ज्या अ‍ॅडजस्टमेंट करणं किंवा सहन करणं कोणासाठीच चांगले नाही. काही गोष्टींमध्ये आपण या अ‍ॅडजस्टमेंट करणं टाळलंच (Relationship Tips) पाहिजे. वारंवार अपमान करणं मित्र-पाहुण्यांसमोर विनोदाच्या नावाखाली जोडीदाराचा अपमान करण्याची अनेकांना सवय असते. काही छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वारंवार जोडीदाराला बोलत राहतात. अशा परिस्थितीतही नेहमी जुळवून घेतल्यानं तुमच्या आतला राग भरून राहत जातो. असे अपमानाचे घुटके घेऊन जगू नये. हे वाचा - मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक संबंध लपवणे तुमच्या जोडीदाराला हे नाते सर्वांपासून लपवून ठेवायचे असेल तर तुम्ही ते जुळवून घेऊ नये. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास तर कमी होईलच पण नात्यातील विश्वासही डळमळीत होईल. चुकीच्या गोष्टींबद्दल शांत राहणं कुटुंबासोबत राहात असाल तर कधी ना कधी कशावरून तरी भांडणे होतात. अशा परिस्थितीत जर तुमचा पार्टनर प्रत्येक वेळी चुकीच्या लोकांचे समर्थन करून तुम्हाला गप्प बसवत असेल किंवा तुम्हाला गप्प राहण्याचा सल्ला देत असेल तर ते तुमच्या आणि तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. जोडीदाराने आपल्या जोडीदारासाठी भूमिका घेणे फार महत्त्वाचे आहे. हे वाचा - रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी का बरं वाढते? मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी दुय्यम लेखणं तुम्ही घरातील कामे करत असा किंवा नोकरी करत असा, दोन्ही बाबतीत तुमचे काम महत्त्वाचे आहे. फक्त पैसे मिळवणाऱ्यालाच किंमत आहे, असे नसते. त्यामुळे जर तुमचा जोडीदार तुमच्या करिअरला किंवा तुमच्या कामाला काही महत्त्व देत नसेल, तर ही गोष्ट त्याला उघडपणे सांगा आणि त्यात जुळवून घेऊ नका. (सूचना : येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Relation, Relationship tips

    पुढील बातम्या