मुंबई, 24 जानेवारी : आपल्यापैकी बरेच लोक बाजारातून आणलेल्या भाज्या (Vegetables) नीट न धुता तसेच शिजवायला घेतात. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी त्या पूर्णपणे स्वच्छ धुणे (Wash) खूप महत्त्वाचे आहे. या साध्या वाटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्याला आणि कुटुंबाला भविष्याच कदातिच मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण फळे आणि भाज्या नीट न धुता खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. काहीजण वेगवेगळ्या गोष्टी पाण्यात मिसळून त्याद्वारे फळे आणि भाज्या धुतात. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण फळे आणि भाज्या फक्त पाण्यातच धुतल्या तर ते पुरेसे (Tips To Wash Fruits-Vegetables) आहे.
आज जाणून घेऊया फळे आणि भाज्या धुण्याचे योग्य मार्ग कोणते आहेत. यासोबतच फळे आणि भाज्या धुण्यासाठी तुम्ही काय करावे याचीही माहिती जाणून घेऊया.
फळे आणि भाज्या धुण्याच्या टिप्स
प्रथम हात धुवा
फळे किंवा भाज्या धुण्यापूर्वी नेहमी आपले हात साबणाने चांगले स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या हातात असलेले बॅक्टेरिया स्वच्छ होतात आणि भाज्या किंवा फळांमध्ये पसरत नाहीत.
ब्रश वापरा
फळे आणि भाज्या धुण्यासाठी भाजीपाला ब्रश वापरा. जेणेकरुन फळे आणि भाज्यांवर असलेले बॅक्टेरिया सहज बाहेर येऊ शकतात.
हे वाचा -
चहा गाळून राहिलेली पावडर फेकू नका; इतक्या कामांसाठी पुन्हा वापरून करा पैशांची बचत
पेपर टॉवेल वापरा
फळे आणि भाज्या पाण्याने नीट धुतल्यानंतर त्यांना पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि काही वेळ ठेवा. यामुळे पाणीही कोरडे होईल आणि उरलेले बॅक्टेरियाही सहज बाहेर येतील.
चॉपिंग बोर्ड आणि चाकू स्वच्छ करा
फळे किंवा भाज्या कापण्यापूर्वी चॉपिंग बोर्ड नीट धुवून स्वच्छ करा. तसेच, चाकू आणि चिपर स्वच्छ करा जेणेकरून त्यांच्यावरील बॅक्टेरियाही निघून जाणे महत्त्वाचे आहे.
हे वाचा -
हिवाळ्यात ब्रोकोली, फुलकोबी वर्गीय भाज्या खाणं आहे फायदेशीर; रक्ताभिसरण क्रिया होते नीट
कापल्यानंतर धुवू नका
भाज्या धुतल्यानंतर सोलून-निवडून घ्या आणि नंतर साली काढून घ्या आणि पुन्हा एकदा हलक्या पाण्याने धुवा. तसेच चॉपिंग बोर्ड आणि चाकू नीट धुवून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाज्या आणि फळे कापल्यानंतर धुवू नका कारण यामुळे त्यातील पोषक तत्वे निघून जातात.
(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.