नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या खूप सामान्य बनली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या, हिवाळ्याच्या दिवसात तर अनेक जणांना याचा त्रास सहन करावा लागतो. तेलकट त्वचेच्या (Oily skin) लोकांना इतर लोकांपेक्षा या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. पिंपल्स घालवण्यासाठी लोक विविध उत्पादने आणि पद्धती वापरतात, परंतु ही समस्या सहजासहजी कमी होत नाही. याचे एक कारण तुम्ही झोपण्याच्या वेळेस त्वचेची नीट काळजी घेत नसणे हे देखील असू शकते. ते पिंपल्सच्या ब्रेकआउटचे एक मोठे कारण असू शकते. पिंपल्स घालवण्यासाठी झोपण्यापूर्वी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता त्याबाबत (Bedtime Skin Care Routine) जाणून घेऊया.
चेहरा धुणे आणि मालिश करणे
झोपण्यापूर्वी चेहरा धुणे आणि मालिश करणे खूप महत्वाचे आहे. बहुतेक लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुत नाहीत. काही लोक आपला चेहरा धुतात पण मसाज करत नाहीत. या गोष्टी करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि घाण निघून जाते आणि रक्ताभिसरणही चांगले होते. तसेच चांगली झोपही येते. किंबहुना, अनेक वेळा मुरुमांची समस्या झोपेच्या कमतरतेमुळेही सुरू होते. झोप पूर्ण घेतल्याने शरीरातील संप्रेरकांचे उत्पादन वाढते, ज्यामुळे ऊतींची दुरुस्ती आणि पुनर्प्रक्रिया होण्यास मदत होते. यासोबतच कोलेजनही चांगल्या स्थितीत राहते, ज्यामुळे केवळ मुरुमांची समस्या कमी होत नाही तर सुरकुत्याही दूर होतात.
केस बांधून झोपा
अनेकांना रात्री केस मोकळे ठेवून झोपण्याची सवय असते. त्यामुळे झोपताना तोंडावर तेलकट केस येतात किंवा केस फुटतात, ज्यामुळेही मुरुमांना पोषक वातावरण मिळते. तसेच, बहुतेक महिला दररोज शॅम्पू करत नाहीत, ज्यामुळे ही समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे नेहमी केस बांधूनच झोपावे, पण हेही लक्षात ठेवा की केस जास्त घट्ट नसावेत हलकेच बांधावे जेणेकरून केस तुटू नयेत.
बेडशीट आणि पिलो कव्हर बदलत राहा
काही वेळा लोक अनेक दिवस एकच बेडशीट आणि पिलो कव्हर वापरत राहतात. त्यावर साचलेली घाण आणि बॅक्टेरिया अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्यांचे कारण बनतात. यासोबतच चेहऱ्यावर असलेले तेल उशीच्या कव्हरमध्येही आढळते, ज्यामुळेही मुरुमे वाढू शकतात. त्यामुळे दोन-तीन दिवसांत बेडशीट आणि पिलो कव्हर बदलत राहा.
हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा
झोपण्याची पद्धत
बरेच लोक पालथे झोपतात, तर काही लोक एका कुशीवर झोपतात. त्यामुळेही मुरुमांच्या वाढीस मदत मिळू शकते. पालथे आणि एका बाजूला झोपल्यामुळे चेहरा बेडशीट आणि उशाच्या कव्हरच्या भरपूर वेळ संपर्कात येतो. म्हणूनच, तुम्ही पाठीवर झोपण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.