केळी खाण्याने आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. केळी इतर फळांपेक्षा स्वस्त (Cheaper Fruit) मिळतात. त्यामुळेही बरेच लोकांना केळी खाणं परवडतं. पण वर्काऊट(Workout) न करणाऱ्या लोकांनी दररोज जास्त केली खाल्ल्यास आरोग्याला फायदा (Health Benefits)होण्याऐवजी नुसकान होऊ शकतं.
2/ 9
केळी खाल्ल्याने वजन वाढू शकतं. जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात,त्या लोकांनी जास्त केळी खाऊ नयेत. कारण केळ्यात कॅलरी जास्त असतात आणि त्यामुळे वजन वाढतं. केळी खाल्ल्यानंतर किंवा केळ्यांबरोबर दूध घेणं टाळलं पाहिजे.
3/ 9
जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होऊ शकतो. कारण त्यामध्ये असलेल्या टॅनिटाईड ऍसिडचा पचनक्रियेवर परिणाम होतो. केळी खाल्ल्याने पोट साफ होत नाहीत. म्हणून केळी कमी प्रमाणात खावीत. लक्षात ठेवा नेहमी पिकलेली केळी खावीत.
4/ 9
केळी जास्त खाल्ल्याने मज्जातंतूंचं नुकसान होण्याचा धोका असतो. वर्काऊट करणाऱ्या लोकांना केळ्यांनी फायदा होतो.
5/ 9
केळ्यात व्हिटॅमीन बी 6 असंत. जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांनी मात्र जास्त केळी खाऊ नयेत.
6/ 9
जास्त केळी खाल्ल्यानेही पोटदुखीची समस्या होऊ शकते. केळ्यात स्टार्च असतं, त्यामुळे पचायला वेळ लागतो. यामुळे पोटात दुखण्याबरोबरच मळमळ आणि उलट्यांचा त्रास देखील होऊ शकतो.
7/ 9
केळ्यांमध्ये फ्रुक्टोज असतं, म्हणून जास्त केळी खाल्ल्यास पोटात गॅस देखील होऊ शकतो.
8/ 9
ज्या लोकांना मायग्रेनमुळे डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी जास्त केळी खाऊ नयेत. केळ्यांमध्ये टायरामाईन नावाचा पदार्थ असतो. जो मायग्रेन वाढवण्यास मदत करू शकतो.
9/ 9
जास्त केळी खाण्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. केळ्यांमध्ये साखर असते,ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढवण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी केळी खाणं टाळावं.