Home /News /lifestyle /

गाढविणीच्या दुधापासून बनणार जगातील सर्वात महाग पनीर, किंमत वाचून येईल भोवळ

गाढविणीच्या दुधापासून बनणार जगातील सर्वात महाग पनीर, किंमत वाचून येईल भोवळ

World’s Most Expensive Paneer: जगातील सर्वात महागडे पनीर हे सोनाराच्या दुकानातही विकले जाऊ शकते. पण, हे पनीर इतके महाग का? यात विशेष काय आहे?

    नवी दिल्ली, 30 जून : एके काळी फक्त उत्तर भारतीयांच्या जेवणापुरतं मर्यादित असलेलं पनीर (Cottage Cheese) आता देशातल्या बहुतेकांच्या जेवणातला आवडता घटक बनलं आहे. अनेकांच्या डाएटमधलाही तो अत्यावश्यक भाग आहे. साधारणपणे सर्वसामान्यांना पनीर परवडतं; पण एका पनीरची किंमत ऐकून मात्र तुम्ही अवाक व्हाल. सहसा पनीर म्हशीच्या किंवा गायीच्या दुधापासून बनवलं जातं; पण हे अत्यंत महागडं पनीर कशापासून बनवलं जातं हे समजलं तर आश्चर्याचा आणखीच मोठा धक्का बसेल. हे जगातलं सगळ्यात महागडं पनीर (Most Expensive Paneer) आहे. आणि हे सगळ्यात महाग पनीर चक्क गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं असतं. याबाबतची माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज'ने दिलं आहे. या लक्झरी पनीरची किंमत ऐकून तर डोळे पांढरे होतील. या पनीरचा दर तब्बल 800 ते 1000 युरो (म्हणजेच तब्बल 82,000 रुपयांपेक्षा थोडं जास्तच) प्रति किलो आहे. जगातल्या सर्वांत महागड्या पनीरपैकी हे एक पनीर आहे. हे पनीर गाढविणीच्या दुधापासून (Paneer Made By Donkey Milk) बनवलं जातं. ते थोडंसं कुरकुरीत असतं आणि पांढरं शुभ्र असतं. हे पनीर स्पॅनिश पनीरसारखं (Spanish Paneer) दिसतं, असं डेली मेलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे; पण त्या चीजपेक्षा याची चव अगदीच वेगळी असते. स्पॅनिश चीज मॅचेंगो ब्रिटिश सुपरमार्केटमध्ये अगदी स्वस्त (1245 रुपये) मिळतं. डाँकी पनीरला पुले (Pule) म्हणूनही ओळखलं जातं. सर्बियामधल्या जसविकामध्ये गाढविणीच्या दुधापासून हे पनीर तयार केलं जातं. चिमुटभर मिठाचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील, वास्तुशास्त्रातील हे उपाय खास हे प्रचंड महाग पनीर बनवण्यासाठीची प्रक्रियाही तशीच खर्चिक आहे. एक किलो पनीर तयार करायचं असेल तर त्यासाठी गाढविणीचं जवळपास 25 लीटर ताजं दूध लागतं. इथलं एक फार्म गाढविणीच्या बाटलीबंद दुधाचं उत्पादनही करतं. डाँकी पनीर हे जगातल्या सगळ्यात महागड्या खाद्य पदार्थांपैकी एक आहे. वाग्यू बीफ आणि इटालियन ट्रफल्सच्या बरोबरीनं याची किंमत आहे असं म्हटलं जातं. स्वीडीश मूसही प्रचंड महाग आहे. त्याची किंमत जवळपास 630 युरो प्रति किलो आहे. Caciocavallo Podolico हे एक अत्यंत दुर्मिळ अशा इटालियन जातीच्या गायीच्या दुधापासून तयार करण्यात येणारं पनीर आहे. ही गाय हे दूध केवळ मे आणि जूनच्या दरम्यानच देते असं म्हटलं जातं. इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिच्या नितळ सौंदर्याचं रहस्य गाढविणीचं दूध हे होतं असं म्हटलं जातं. क्लिओपात्रा रोज गाढविणीच्या दुधानं आंघोळ करायची अशी आख्यायिका आहे. तुम्हालाही इच्छा असेल तर हे महागडं पनीर बघा खाऊन... फक्त त्यासाठी हजारो युरो मोजायची तयारी ठेवा.
    First published:

    Tags: Donkey meat, Health

    पुढील बातम्या