Home /News /lifestyle /

चिमुटभर मिठाचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील, वास्तुशास्त्रातील हे उपाय आहेत खास

चिमुटभर मिठाचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील, वास्तुशास्त्रातील हे उपाय आहेत खास

वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्याचे काम करते.मिठाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी वाढवण्यास मदत होते. त्याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 30 जून : प्रत्येक घरात जेवणासाठी मिठाचा वापर नक्कीच केला जातो. मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण ते आपल्याला नकारात्मक शक्तींपासूनही दूर ठेवते. वास्तुशास्त्रानुसार, मिठाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी वाढवण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार मीठ कधीही धातूच्या भांड्यात ठेवू नये. मीठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावे, असे केल्याने घरात सुख-शांती राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रातील मीठाचे उपाय (Vastu Tips) जाणून घ्या. नकारात्मक ऊर्जा - प्रत्येक घरात मीठ वापरले जाते. वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्याचे काम करते. तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवा. असे केल्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरापासून दूर राहतील आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल. पैशाची कमतरता - वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल तर मीठ हा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी एका काचेच्या भांड्यात दोन चमचे मीठ आणि त्यात चार ते पाच लवंगा टाका आणि घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा, जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरात पैशाचे आगमन सुरळीत सुरू होते आणि आर्थिक संकट दूर होते. तणाव दूर करण्यासाठी - जर एखादी व्यक्ती तणावातून जात असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्या व्यक्तीने सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून स्नान करावे. असे केल्याने व्यक्तीचा तणाव तर दूर होईलच, तसेच व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल. हे वाचा - शनि अमावस्येला अशी कामं कोणाच्याच हातून घडू नयेत; शनिची वक्रदृष्टी ठरेल तापदायक कुटुंबाच्या आनंदासाठी - कुटुंबातील लोकांमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतील तर पोछा मारण्याच्या पाण्यात चिमूटभर काळे मीठ मिसळून घर पुसावे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. हा उपाय रोज करण्याचा सल्ला दिला जात असला तरी काही कारणास्तव हा उपाय तुम्हाला दररोज करणे शक्य होत नसेल तर दर मंगळवारी हा उपाय अवश्य करा. हे वाचा - दिवसातून एकदा तरी खा काजू; स्कीन आणि केसांवर दिसायला लागेल परिणाम आरोग्य सुधारण्यासाठी - जर तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा दीर्घकाळ आजारी असेल. त्यामुळे त्याच्या बेडजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि दर महिन्याला ते बदला. असे केल्याने आजारी व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते असे वास्तुशास्त्र सांगते. व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईपर्यंत असं करणे आवश्यक आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Vastu

    पुढील बातम्या