नवी दिल्ली, 10 एप्रिल : भारतात वाढत्या वजनामुळे अनेक लोक चिंतेत आहेत. कोरोनाव्हायरस लॉकडाऊन आणि घरातून कामामुळे (Work from home) ही समस्या आणखी वाढली आहे. पोटावर चरबी असण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे, व्यायाम न करणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे इ. पोटात चरबी (Belly Fat) साचणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेक वेळा असे होते की तुम्ही फारसे जाड नसला तरी पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते. तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून या समस्येवर मात करता येते. याबाबत झी न्यूजने बातमी दिली आहे.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स
1. ओव्याचं पाणी प्या
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी पिणं हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी फायदेशीर आहे, त्यामुळे पचन देखील सुधारते. एक चमचा ओवा पाण्यात भिजवून रात्रभर भांड्यात ठेवा. सकाळी उठल्यावर त्यात थोडं मध टाकून हे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
2. जास्त खाणं टाळा
काही लोकांना त्यांच्या भूकेपेक्षा जास्त खाण्याची वाईट सवय असते. अनेकदा हॉटेल-पार्ट्यांमध्ये आपण भरपूर खातो. असं करणं चुकीचं आहे, योग्य मार्ग म्हणजे आपल्याला आवश्यक तेवढेच आणि भूकेपेक्षा थोडं कमी खायला हवे. एकावेळी जास्त आहार घेतल्याने पोटाची चरबी वाढू लागते. 2 ते 3 तासांच्या अंतराने खाल्ले तर पचनक्रियाही सुरळीत होते. यासोबतच नियमितपणे योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
हे वाचा - वजन कमी करण्यासाठी Black Coffee अशी ठरते फायदेशीर; साईड इफेक्टशिवाय weight loss
3. गोड पदार्थ कमी खा
जर तुम्हाला गोड पदार्थ जास्त आवडत असतील तर ते केवळ लठ्ठपणाच नाही तर मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आजारांचे कारण बनू शकते. तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारातून गोड पदार्थाचे प्रमाण कमी केलं तर हळूहळू पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम काही आठवड्यांत दिसून येईल.
हे वाचा - 30 वर्षांनंतर शनिदेवांची स्वारी येतेय स्वराशीत; या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss