Home /News /lifestyle /

बाजरीच्या पिठाचे हे फायदे माहिती आहेत का? Diabetes आणि BP ठेवते नियंत्रित

बाजरीच्या पिठाचे हे फायदे माहिती आहेत का? Diabetes आणि BP ठेवते नियंत्रित

बाजरीचे पीठ अनेक आरोग्यवर्धक गुणांनी समृद्ध आहे. खाल्यास तुम्ही अनेक आजारांना दूर ठेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पीठाचे काही महत्वाचे फायदे (Millet Flour Benefits) सांगणार आहोत.

  मुंबई, 27 जून : आपण रोजच्या आहारात शक्यतो गव्हाचे पीठ (Wheat Flour) जास्त प्रमाणात खातो. त्याखालोखाल मैदादेखील खातो. मात्र बाजरी, ज्वारी असे पीठ आपण कमी प्रमाणात खातो. कारण भाकरी सर्वानाच आवडते असे नाही. परंतु तुम्हाला बाजरीच्या पिठाचे फायदे (Millet Flour Benefits) माहित आहेत का? बाजरीचे पीठ अनेक आरोग्यवर्धक गुणांनी समृद्ध आहे. खाल्यास तुम्ही अनेक आजारांना दूर ठेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पीठाचे काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत. प्रोटीन आणि फायबरचे ऊत्तम स्रोत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन (Source Of Protein) असते. त्यामुळे जे लोक व्हेजिटेरियन आहेत. त्यांच्यासाठी बाजरी हा प्रोटीनचा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. ते आपल्या शरीरातील स्नायूंचे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबरदेखील (Source Of Fiber) आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. शरीरात फायबर चांगली प्रमाणात असेल तर आपली सुरळीत राहते आणि त्यामुळे पोटासंबंधित अनेक आजार दूर राहतात. झोपेत कोणताच आवाज ऐकू येत नाही, असं का? जाणून घ्या झोपेसंबंधी महत्वाच्या गोष्टी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर बाजारामध्ये असलेले फायबर आपली पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि त्यामुळे आपल्याला बध्ध्दकोष्टतेचा त्रास होत नाही. बाजरी खाल्यानंतर आपल्याला बराचकाळ पोट भरलेले असल्यासारखे वाटते. त्यामुळे अतिरिक्त अन्न खाणे आपण टाळतो आणि वजन नियंत्रित (Weight Loss) राहण्यास मदत होते. त्याचबरोबर जे लोक ग्लूटेन फ्री अन्न (Gluten Free Food) खाणे पसंत करतात त्यांच्यासाठी बाजरीचे पीठ हा सर्वात उत्तम पर्याय आहे. डायबिटीजसाठी लाभदायक बाजरीच्या बीपीठामध्ये मॅग्नेशियम असते. हे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते, जे डायबिटीजसाठी (Good For Diabetes) खूप चांगले असते. शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असेल तर शरीरातील इन्सुलिनचे सिक्रीशन योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे रक्तातील शुगरचे प्रमाणही नियंत्रित राहत नाही. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी बाजरीच्या पिठाचे प्रमाणात सेवन नक्की करावे.

  रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी बेस्ट आहेत हे 5 Food Combination; कमी करतात अ‍ॅनिमियाचा धोका

  ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी असते चांगले बाजरीचे पीठ केवळ डायबिटीजच नाही तर ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही चांगले असते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर बाजरीचे पीठ फायबरने समृद्ध असल्यामुळे ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. त्याचबरोबर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते जे तुमच्या शरीरातील सोडियम बाहेर टाकण्याचे काम करते. त्यामुळे बाजरीचे पीठ हाय ब्लड प्रेशर (Good For High Blood Pressure) असणाऱ्या लोकांसाठी उत्तम असते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Superfood

  पुढील बातम्या