मुंबई, 03 मार्च: कोणत्याही प्रकारचं व्यसन आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं. अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे व्यसनांकडे आकर्षित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. मद्यपान (Alcoholism), तंबाखू सेवनामुळे (Tobacco) कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे व्यसनं टाळणं गरजेचं आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीनं मद्यपान केल्यानंतर त्याच्या शरीरात नेमके काय बदल होतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. मद्यपान केल्यानंतर शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो. प्रमाणापेक्षा अधिक दारू प्यायल्यास संबंधित व्यक्तीचा तोल जाऊ लागतो. त्याचं शरीरावरचं कंट्रोल जातं. यामागे काही कारणं आहेत.
जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते आणि त्यातही ते प्रमाणापेक्षा अधिक होतं, तेव्हा त्याचा शरीरावरचा कंट्रोल जाऊ लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीला बोलण्यास (Speech) त्रास होऊ लागतो. असं होण्यामागं काही कारणं आहेत. जेव्हा दारूचा घोट घेतला जातो, तेव्हा ती शरीरात जाताच तिचे परिणाम दिसू लागतात. अल्कोहोल शरीरात जाताच ते सर्वप्रथम गॅस्ट्रिक अॅसिडची (Gastric Acid) निर्मिती करू लागतं. त्यामुळे पोटातल्या म्युकस ट्रॅकमध्ये सूज येऊ लागते. यानंतर अल्कोहोल आतड्यांमध्ये शोषलं जातं आणि ते विंगच्या माध्यमातून लिव्हर (Liver) अर्थात यकृतपर्यंत पोहोचतं. लिव्हर अगदी जवळ असल्याने, ते पोटातून थेट यकृतापर्यंत पोचण्याची दाट शक्यता असते.
हे वाचा-2 वर्षांतच 219 किलोच्या महिलेने घटवलं 141 किलो वजन; 78 किलोची होताच भयंकर अवस्था
मद्यपानामुळे लिव्हरवर प्रतिकूल परिणाम होतो. दारू प्यायल्यानंतर लिव्हर योग्य पद्धतीनं काम करू शकत नाही. लिव्हरमध्ये वेदना होत नसल्याने संबंधित व्यक्तीला कोणताही त्रास जाणवत नाही. परंतु, डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर आजाराची तीव्रता लक्षात येते. त्यामुळे अधिक प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांनी सातत्याने वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
'डीडब्ल्यू'च्या वृत्तानुसार, जेव्हा अल्कोहोल लिव्हरमध्ये पोहोचतं, तेव्हा लिव्हर बहुतांश अल्कोहोल नष्ट करून टाकतं. यामुळे शरीरावर होणारे प्रतिकूल परिणाम कमी होतात. परंतु, जे घटक लिव्हरला नष्ट करता येत नाहीत, ते थेट मेंदूपर्यंत (Brain) पोहोचतात. अशा स्थितीत बॉडी पॅकचा प्रभाव मेंदूवर होतो. अल्कोहोल मज्जासंस्थेवर (Central Nervous system) परिणाम करू लागतं. यानंतर मज्जासंस्थेचा संपर्क तुटतो आणि पेशी अतिशय संथपणे काम करू लागतात. मग मेंदू या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सक्षम राहत नाही. त्यानंतर मेंदूच्या मध्यवर्ती भागावर अल्कोहोल प्रतिकूल परिणाम करू लागतं. त्यामुळे व्यक्ती स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसते.
हे वाचा-उपवास केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतंय? या 4 चुका चुकूनही करू नका
मद्यपानामुळे लिव्हर, आतडं, मज्जासंस्था आणि मेंदू आदी अवयवांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. याचा एकत्रित परिणाम संबंधित व्यक्तीच्या शरीरावर दिसून येतो. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान टाळणं आरोग्यासाठी हितावह ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol