जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Water After Food: तुम्हीही जेवणानंतर लगेच पाणी पिता का? इतके प्रॉब्लेम्स नकळत मागे लागतात

Water After Food: तुम्हीही जेवणानंतर लगेच पाणी पिता का? इतके प्रॉब्लेम्स नकळत मागे लागतात

पाणी पिणे - 
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.

पाणी पिणे - अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.

जे लोक जेवणानंतर लगेच पाणी पितात (Water After Food) त्यांच्या लक्षात येत नाही, मात्र अनेक आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागू (Proper watering time) शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 एप्रिल : आपल्या आरोग्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे, हे कोणाला नव्याने सांगण्याची गरज नाही. यामुळेच आरोग्य तज्ज्ञांनी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवताना पाणी पिणे टाळायला हवे, जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडिटी, ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक जेवणानंतर लगेच पाणी पितात (Water After Food) त्यांच्या लक्षात येत नाही, मात्र अनेक आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागू (Proper watering time) शकतं. जेवल्यानंतर किती वेळानं पाणी प्यावं? झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, अन्न पचण्यास सुमारे 2 तास लागतात, दरम्यान पाणी पिल्याने पचनावर परिणाम होतो. म्हणूनच अन्न खाल्ल्यानंतर 45-60 मिनिटांनी पाणी पिणं योग्य ठरेल. हे देखील लक्षात ठेवा की जेवण करण्यापूर्वी अर्धा तास पाणी पिऊ नये. योग्य वेळी पाणी पिण्याचे फायदे 1. अन्न खाल्ल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. 2. योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर राहते, पचनक्रिया मजबूत राहते. 3. पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उरत नाही. 4. शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते. 5. योग्य वेळी पाणी प्यायल्यानेही चांगली झोप येण्यास मदत होते. हे वाचा -  वारंवार पाणी पिऊनही भागत नाहीये तहान; ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं हे लक्षण अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसान लठ्ठपणा वाढू शकतो पचनाच्या समस्या वाढतात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते पोटात गॅसची समस्या हे वाचा -  वजन वाढवणं अवघड काम नाही, आहारात नियमित या 5 गोष्टी घेऊन व्हा धष्टपुष्ट (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात