मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महिलांप्रमाणे पुरुषांनाही होतो मेनोपॉज?, जाणून घ्या कोणत्या वयात आणि काय म्हणतात डॉक्टर

महिलांप्रमाणे पुरुषांनाही होतो मेनोपॉज?, जाणून घ्या कोणत्या वयात आणि काय म्हणतात डॉक्टर

पुरुषांनाही होतो मेनोपॉज

पुरुषांनाही होतो मेनोपॉज

स्त्रियांमध्ये वय वर्ष 50 च्या आसपास मेनोपॉज (Menopause) होते. यामध्ये, अंडाशयात तयार होणारे इस्ट्रोजेन हॉर्मोन पूर्णपणे कमी होतात, आणि त्यामुळे मासिक पाळी थांबते. पण पुरुषांच्या बाबतीतही असं घडतं का?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : स्त्रियांमध्ये वय वर्ष 50 च्या आसपास मेनोपॉज (Menopause) होते. यामध्ये, अंडाशयात तयार होणारे इस्ट्रोजेन हॉर्मोन पूर्णपणे कमी होतात, आणि त्यामुळे मासिक पाळी थांबते. या प्रक्रियेपूर्वी आणि नंतर महिलांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांमधून जावं लागतं. पण पुरुषांच्या बाबतीतही असं घडतं का? पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा हॉर्मोन प्रजननासाठी जबाबदार असतो. वाढत्या वयाबरोबर टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनही कमी होतो. परंतु स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्ये मेनोपॉज दिसून येत नाही. पण काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, पुरुषांनादेखील स्त्रियांप्रमाणे मेनोपॉज येते.  मेनोपॉजच्या वेळी स्त्रियांना ज्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो, त्याच शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना या काळात पुरुषांनाही करावा लागतो.

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यावर त्यांना स्त्रियांप्रमाणेच रजोनिवृत्ती येते की नाही, याबद्दल डॉक्टरांचे अजूनही एकमत नाही. परंतु वय वर्ष 50 च्या आसपास किंवा त्यानंतरही काही पुरुषांमध्ये ही समस्या महिलांप्रमाणे दिसते. या काळात पुरुषांनी हॉर्मोन थेरपी घेतल्यास त्यांना या समस्येपासून सुटका मिळू शकते, असं डॉक्टरांचं मत आहे. चला तर, ज्या पुरुषांमध्ये ‘पुरुष  मेनोपॉज’ दिसून येते, त्यांना कोणत्या लक्षणांना सामोरं जावं लागतं, ते जाणून घेऊयात.

हेही वाचा -  आळशीपणा घेऊ शकतो तुमचा जीव; गाफील राहू नका, पाहा काय आहे WHO चा रिपोर्ट

पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणं

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ‘वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची पातळी कमी होऊ लागते. या दरम्यान, पुरुषांनादेखील काही समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु ज्यांना मधुमेह आहे, त्यांना अधिक त्रास होतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कमी झाल्यानंतर, त्यांना पुढील काही महिने थकवा अधिक येतो. अशा पुरुषांमध्ये अशक्तपणा येतो, आणि ते नैराश्यात जगू लागतात. टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कमी झाल्यास लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. चिडचिड होते. त्वचाही पातळ होऊ लागते. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते. जास्त घाम येतो, आणि काही पुरुषांना महिलांप्रमाणे हॉट फ्लॅशेज येतात.

कोणत्या वयात येते पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती?

पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पूर्णपणे नाहीसं होत नाही, परंतु त्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते. डॉक्टरांच्या मते, 80 वर्षांपर्यंत निरोगी पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्राणू तयार होऊ शकतात. तर, काही पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती 50 वर्षांच्या आसपास सुरू होते, तर काहींमध्ये ती वय वर्ष 70 पर्यंत कधीही सुरू होऊ शकते.

उपचार काय

अशावेळी ब्लड टेस्ट करून डॉक्टर काही महत्त्वाच्या तपासण्या करतात. टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासली जाते. त्याच्या लक्षणांच्याआधारे शारीरिक तपासणी केली जाते. डॉक्टर काही औषधं देऊन, ही समस्या बरी करण्याचा प्रयत्न करतात. औषधांनी व्यक्ती बरा झाला नाही, तर हॉर्मोन थेरपी दिली जाते.

First published:

Tags: Health, Lifestyle