जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali recipes : करंजी करण्याच्या काही सोप्या पद्धती; या पद्धतीने केला तर कधीच बिघडणार नाही पदार्थ

Diwali recipes : करंजी करण्याच्या काही सोप्या पद्धती; या पद्धतीने केला तर कधीच बिघडणार नाही पदार्थ

Diwali recipes : करंजी करण्याच्या काही सोप्या पद्धती; या पद्धतीने केला तर कधीच बिघडणार नाही पदार्थ

करंजी हा पदार्थ, त्याची रेसिपी भारतभर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. करंजी बनवणं तसं अतिशय नाजूक काम असल्याने यात वेळही अधिक जातो. पण तुमचा काहीसा वेळ वाचण्यासाठी, करंजी उत्तम बनण्यासाठी पाहा काही सोप्या, सहज आणि खास टिप्ससह बेस्ट रेसिपीज…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 नोव्हेंबर : दिवाळी जवळ आली की, सगळ्यात आधी वेध लागतात ते फराळाचे (diwali faral). दिवाळीचा फराळ तसा शक्यतो वर्षभर केला जात नाही. दिवाळी म्हटलं की, फराळ हे समीकरण आलंच. कोरोना काळात यंदाची दिवाळी काहीशी साधेपणाने, फटाके न वापरता करायची असली तरी, फराळ तर होणारच आहे. दिवाळी फराळात करंजी हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे. करंजी हा पदार्थ, त्याची रेसिपी भारतभर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. महाराष्ट्रातल्या काही भागात करंजीला कानवलेही बोललं जातं. खोबऱ्याची, रव्याची आणि इतर विविध प्रकारच्या, विविध पद्धतीने करंजा केल्या जातात. करंजी बनवणं तसं अतिशय नाजूक काम असल्याने यात वेळही अधिक जातो. पण करंजी बनवणं जरा सोपं होण्यासाठी, तुमचा काहीसा वेळ वाचण्यासाठी आम्ही देतोय काही सोप्या, सहज आणि खास टिप्ससह YouTube वरील बेस्ट रेसिपीज… 1. मैदा, सुकं खोबरं आणि रव्याची करंजी -

मैदा, सुकं खोबरं आणि रव्याचा वापर करून तयार केलेलं करंजीचं सारण नक्कीच कमाल चवीचं असले. यात करंजीवर सॉफ्ट लेयर येण्यासाठी केलेली झटपट कृती तुमच्या फायद्याची ठरेल आणि वेळही वाचेल. 2. रवा-नारळाचं करंजी सारण -

स्वादिष्ट करंजी करण्यासाठी करंजीचं सारण बनवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सारण चविष्ट, उत्तम बनणं महत्त्वाचं आहे. या रेसिपीमध्ये दाखवण्यात आलेली पद्धत, सारणासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंचं प्रमाण, तुमची करंजी परफेक्ट बनवण्यासाठी नक्कीच मदत करेल. 3. खुसखुशीत करंजी -

करंजीचं कव्हर, त्याचं कोटिंग खुसखुशीत असेल, तर करंजी खाण्याची मज्जाच वेगळी असते. करंजीचं कव्हर खुसखुशीत होण्यासाठी कॉर्नफॉव्हर वापरण्याची ही पद्धत तुम्हीही करून पाहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात