नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : दिवाळी (Diwali) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिव्यांची आरास करून, आकर्षक रोषणाई करून फराळादी गोष्टींसह दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने घातलेले नियम शिथिल झाल्याने उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळीमध्ये घरात लक्ष्मीचं (Maa Lakshmi) आगमन होतं, असं म्हटलं जातं. यासाठी घराची साफसफाई केली जाते. दिवाळीच्या उत्सवाची (Festival) तयारी खूप आधीपासून सुरू होते. दिवाळीसंदर्भात शकुन शास्त्रातही (Shakun Shastra) काही श्रद्धा प्रचलित आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना अचानक काही गोष्टी, पक्षी-प्राणी समोर आले, तर त्याचं दर्शन लाभदायक ठरू शकतं, असं शकुनशास्त्र सांगतं.
सहसा दिवसाही न दिसणारे काही प्राणी-पक्षी किंवा जीव दिवाळीच्या रात्री (Night) दिसले, तर ते लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत असतात, असं म्हटलं जातं. त्याने वर्षभर घरात सुख-समृद्धी आणि आणि धन-दौलत राहते. त्याविषयी जाणून घेऊ या.
हे वाचा -
Instagram अकाऊंट डिलीट करण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी; नाही तर होईल पश्चाताप
घुबड -
खरं तर घुबडाला (Owl) अशुभ मानलं जातं. घुबडाचे दर्शन अनेक ठिकाणी शुभ, तर अनेक ठिकाणी अशुभ मानलं जातं. आपल्या समाजात घुबडांविषयी अनेक समज आहेत; मात्र घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळीच्या वेळी घुबड दिसणं हे चांगलं मानलं जातं. दिवाळीच्या रात्री घुबड दिसलं तर घुबडावर बसून लक्ष्मीचं घरी आगमन झालं आहे, असं मानलं जातं.
चिचुंद्री -
चिचुंद्री हा दिसायला उंदरासारखा असलेला प्राणी. दिवाळीच्या रात्री चिचुंद्रीचं दर्शन घडणं शुभ मानलं जातं. दिवाळीच्या रात्री चिचुंद्री दिसल्यास घरात संपत्तीची कमतरता जाणवत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळीच्या रात्री त्यांचं दर्शन होणं हे भाग्यवंत असल्याचं सूचक आहे.
हे वाचा -
‘बाळासाहेबांच्या खोलीत तुम्ही दिलेला शब्द मोडला म्हणून…, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
मांजर -
मांजर (Cat) आडवं गेलं तर लोक थांबतात आणि एखादी दुसरी व्यक्ती पुढे जाईपर्यंत पुढे जात नाहीत. असं केल्याने अशुभ शकुन संपतो, अशी लोकांची समजूत असते. अशा समजुती पारंपरिक पद्धतीने अनेक पिढ्या चालत आल्या आहेत; मात्र दिवाळीच्या रात्री मांजराचं दर्शन होणं खूप शुभ मानलं जातं. दिवाळीच्या पूजेनंतर घरात किंवा जवळ कुठेही मांजर दिसले तर ते लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक असतं. दिवाळीच्या रात्री तुम्हाला मांजर दिसलं, तर तुमचं भाग्य उजळत असल्याचा तो संकेत असतो, असं मानलं जातं.
पाल -
पाल (Lizards) आपल्याला घरातल्या भिंतीवर दिसून येते. पाल दिसल्यावर आपण तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो; मात्र दिवाळीच्या दिवशी असं करू नये असं म्हटलं जातं. कारण, शकुन शास्त्रानुसार दिवाळीच्या रात्री पाल दिसणं शुभ आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. या दिवशी घरात पाल दिसणं हे लक्ष्मीच्या आगमनाचं लक्षण असल्याचं म्हटलं जातं.
हे वाचा -
कोरोनानंतर अनेकजण ‘ब्रेन फॉग’मुळे आहेत त्रस्त; त्याची काय आहेत लक्षणं, अशी घ्यावी काळजी
गाय -
संस्कृतमध्ये ‘गौ विश्वस्य मातरम्’ असं म्हटलं जातं. ‘गाय विश्वाची माता आहे,’ असा त्याचा अर्थ होतो. गाय कायमसाठीच पूजनीय असते. त्यातही शकुन शास्त्रानुसार दिवाळीच्या रात्री गाय (Cattle) दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. गाय हे देवत्वाचं प्रतीक मानलं जातं. दिवाळीच्या दिवशी किंवा रात्री गाय दिसणं हे घरात आनंद आणि समृद्धी आणतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.