लाइफस्टाइल

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

कोरोनाचं भान ठेवा! दिवाळीनिमित्त घरी पार्टी करताना ही काळजी घ्या

कोरोनाचं भान ठेवा! दिवाळीनिमित्त घरी पार्टी करताना ही काळजी घ्या

कोरोना काळात पार्टी करणं देखील जोखमीचं आहे पण असा काही डोक्यात प्लॅन असेल तर ही काळजी नक्की घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कोरोनाच्या या संकटाचा या वर्षी सर्व सणांवर प्रभाव पडला आहे. परंतु नागरिकांचा उत्साह कमी झालेला नाही. यावर्षी 14 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. त्याचबरोबर दिवाळी हा सण सुख आणि समृद्धी देखील घेऊन येतो. दिल्लीत दिवाळीत नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात फराळ करतात आणि पत्ते खेळतात याला कार्ड पार्टी म्हणतात. परंतु या कोरोनाच्या संकटात तुमच्या जवळच्या मित्रमंडळींनाच आमंत्रण देऊन तुम्ही या खेळाचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर या पार्टीमध्ये सर्व सहभागी लोकांनी मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणं ही आयोजकांची जबाबदारी आहे.

त्यामुळे या वर्षी दिवाळी कार्ड पार्टी आयोजित करताना ही काळजी घ्या

1) खाद्यपदार्थ आणि पेय

कोरोनाच्या या संकटात स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हायजिन पाळलं जाणाऱ्या ठिकाणांवरूनच खाद्यपदार्थ आणि पेय ऑर्डर करा. त्याचबरोबर शक्य असेल तर घरी पदार्थ बनवले तर अधिक उत्तम. त्याचबरोबर हा पारंपरिक सण असल्याने खाद्य देखील पारंपरिक ठेवल्यास अधिक उत्तम.

2)बसायला खाली बैठक व्यवस्था

मोठ्या प्रमाणात मित्र आणि नातेवाईक एकत्र येत असल्याने टेबल आणि खुर्चीची बैठक व्यवस्था योग्य पर्याय ठरणार नाही. अशावेळी खाली कार्पेट किंवा चटई टाकून त्याबरोबर आधाराला उशा ठेवल्यास या सारखी उत्तम बैठक व्यवस्था होणार नाही.

हे वाचा-अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान SMBने ई-वाणिज्य संधीसह यशाची गोडी चाखली

3) थीम

साधारणपणे पार्टी करताना पार्टी एखाद्या थीमवर आधारित असेल तर खुलते. या पार्टीमध्ये तुम्ही थीम ठरवून तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्याप्रमाणे कपडे घालण्यास सांगू शकता. त्याचबरोबर सजावट करून देखील तुम्ही पार्टीचे आकर्षण वाढवू शकता. पण प्रत्येकाच्या तोंडावर मास्क मात्र हवा.

4) रंगीत कार्ड

दिवाळीच्या या पार्टीमध्ये पत्ते हेच शो स्टॉपर असतात. त्यामुळे तुम्ही विविध रंगांच्या कार्डने पार्टीची शोभा वाढवू शकता. शो स्टॉपर असणारे हे पत्ते तुम्ही दुकानातून खरेदी करू शकता.

5) दिवाळी गीत

दिवाळीची पार्टी ही गाण्यांविना अपूर्ण आहे. पार्टी सुरु करण्याआधी या गाण्यांची तयारी करायला विसरू नका. यामध्ये काही डान्स ट्रॅक आणि दिवाळीच्या गाण्यांचा देखील समावेश करावा.

First published: November 13, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading