लाइफस्टाइल

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

Diwali 2020 : का साजरी केली जाते दिवाळी? या सणाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून

Diwali 2020 : का साजरी केली जाते दिवाळी? या सणाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून

दीपावली हा सण आपण साजरा करतो पण तो का साजरा केला जातो? लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : हिंदू सणांमध्ये गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा आणि प्रमुख सण दिवाळी साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून या दीपावलीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते. गणरायाला नमन केलं जातं. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.

हे वाचा-ग्रीन फटाक्यांमध्ये असं असतं तरी काय ज्यामुळे कमी होतं प्रदूषण?

कृष्णानं नरकाचा वध केला तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. घरातील अमंगळ जावं आणि घरातील धन-दौलत समृद्धी कायम राहावी यासाठी लक्ष्मीपूजन केलं जातं. बली राजाचा नाश केल्याचं प्रतिक म्हणून बलीप्रतिपदा साजरी केली जाते. शटकासुराचा वध करून असंख्य भगिनींना आणि त्यांच्या भावाला सोडवल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याची प्रथा आहे. याशिवाय प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करून अयोध्येला आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी केली जाते असंही पुराणांमध्ये सांगितलं जातं.

दीपावलीच्या वेळी घराबाहेर दीव्यांची आरास म्हणजेच एका ओळीत काही अंतरानं दिवे लावण्याची परंपरा आहे. शेतात पिकलेलं धान्य यावेळी घरी भरलं जातं. त्यामुळे बळीराजाही आनंदात असतो. या धान्याचं पूजन करून बाजारात विक्रीसाठी आणलं जातं.

कधी आहे दिवाळी

12 नोव्हेंबर - वसुबारस

13 नोव्हेंबर- धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, यमदीपदान

14 नोव्हेंबर- नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन- शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.28

16 नोव्हेंबर - दीपावली पाडवा, भाऊबीज

अमावास्या प्रारंभ- 14 नोव्हेंबर 2020 दुपारी 2. 17 ते 15 नोव्हेंबर सकाळी 10.36 मिनिटं

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही .)

First published: November 3, 2020, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading