मुंबई, 12 नोव्हेंबर : चिवडा हा तर संपूर्ण दिवाळीच नाही तर हक्काचे बाराही महिने खाता येईल असा पदार्थ. हा चिवडा वेगवगळ्या पद्धतीनं करण्याची पूर्वीपासून पद्धत आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा चिवडा बाहेरून विकत घेतला जातो. पण कोरोनामुळे आणि वर्क फ्रॉम होम असेल तर तुम्हाला घरच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीनं चिवडा तयार करता येईल. YouTube वर चिवड्याच्या रेसिपीचे बरेच व्हिडीओ आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी इथं देत आहोत. या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चिवडा कसा तयार केला आहे आणि आणखीन काय छान वेगळेपणा त्यात करता येईल हे या व्हिडीओमधून आपल्याला समजू शकतं. यापैकी कोणत्याही व्हिडीओचा आधार घेऊन खमंग आणि स्वादिष्ट चिवडा तुम्ही तयार करू शकता. दोन ते तीन आठवडे राहिल असा आंबड गोड कमी तेलात खमंग जाड पोह्याचा चिवडा कसा तयार करायचा हे या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
बऱ्याचदा दिवाळीत नुसत्या पोह्यांपेक्षा पोहे आणि चुरमुरे किंवा भडंग किंवा पोहे आणि शेव मिक्स असा चिवडा खायला आवडतो. त्याची वेगळी चवही येते. 7 मिनिटांत अगदी कमी साहित्यात हा चिवडा कसा उत्कृष्ट आणि स्वादिष्ट होतो पाहा.
फक्त 10 मिनटांत बनवा मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत स्पेशल कोल्हापूरी भडंग. हे दिवाळी स्पेशलच नाही तर इतर दिवशीही तुम्ही मधल्या वेळेत खाऊ शकता.
जाड किंवा दगडी पोहे ज्याला म्हणतात अशा पोह्यांचा खूप सुंदर तळून चिवडा होतो. ही पद्धत खूप सोपी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर चिवड्यांपेक्षा हा चिवडा चविला देखील खूप वेगळा लागतो.अतिशय खुसखुशीत आणि खमंग तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा