जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Digital Prime time : ब्रेकअप के बाद! "ती मुव्ह ऑन झाली पण मी तिला विसरू शकलो नाही"

Digital Prime time : ब्रेकअप के बाद! "ती मुव्ह ऑन झाली पण मी तिला विसरू शकलो नाही"

Digital Prime time : ब्रेकअप के बाद! "ती मुव्ह ऑन झाली पण मी तिला विसरू शकलो नाही"

तरुण वय आणि प्रेम नाही असं होत नाही. पण याच वयात ब्रेकअप झालं की सावरणं कठीण होतं. सर्व काही विसरून पुढे जाण्याची इच्छा असते पण तरी त्या व्यक्तीला विसरणं अशक्य होतं. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करायला हवं याबाबत तज्ज्ञांचा सल्ला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट : माझ्या गर्लफ्रेंडसोबत 7 वर्षे मी रिलेशनशिपमध्ये होतो. गेल्याच वर्षी आमचं ब्रेकअप झालं आणि याचं कारण म्हणजे तिच्या आई-वडिलांचा आमच्या नात्याला असलेला विरोध. आमचं कॉलेजमधील प्रेम. ती श्रीमंत आणि मी मध्यमवर्गीय.  मी तसा नोकरीला आहे पण करिअरची ही सुरुवातच. त्यामुळे तिच्या घरच्यांना हवं तितकं मी कमवत नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी आमच्या लग्नाला नकार दिला आणि तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवलं. तिनेही आईवडिलांचा विचार करून त्या मुलाशी लग्न केलं. आम्ही-दोघं वेगळं झालो, तिचं लग्न झालं. आता माझ्या घरातूनही माझ्या लग्नाचा विषय निघत आहे. पण तरी तिचा विचार अजून माझ्या मनातून जात नाही. कधीतरी तिच्या आई-वडिलांच्या घराजवळून जातो. तिचं सोशल मीडिया तपासतो. तिच्याशी संपर्कही करण्याचा प्रयत्न केला पण तिच्याकडून कधी काही उत्तर आलं नाही. कदाचित ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली असावी पण मी मात्र अजून तिथेच आहे.  तिला विसरू शकत नाही आहे, तिच्यातच गुंतून आहे, त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही. काय करू काहीच कळत नाही आहे. मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मलिक मर्चंट - “जेव्हा रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होतं तेव्हा भावनिक गोंधळ उडतो. जेव्हा आपली गर्लफ्रेंड दुसऱ्या कुणाशीतरी लग्न करते तेव्हा बहुतेक तरुणांना आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते. आता आपण एकटं राहणार, आपल्याला कुणीच पार्टनर भेटणार नाही, असं वाटतं. एकटेपणाची भावना येते. ती व्यक्ती दुहेरी भावनांमधून जाते. एकिकडे आपली गर्लफ्रेंड आपल्याला सोडून गेली याचा राग येतो आणि आपण नातं टिकवू शकलो नाही म्हणून स्वतःला दोष दिला जातो. तर दुसरीकडे त्याचवेळी गर्लफ्रेंड सोबत हवी असते किंवा किमान एकदा तरी तिच्याशी शेवटचं बोलायचं असतं. असे बरेच वेगवेगळे विचार, भावना मनात कल्लोळ करत असतात”

News18

डॉ. मर्चंट पुढे म्हणाले, “या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तर्कशुद्धपणे विचार करण्याची आणि वागण्याची गरज आहे. विचारांवर भावनांना भारी पडू देऊ नका. शक्य असेल तर एक्स-गर्लफ्रेंडशी संपर्क टाळा. आता काहीच शक्य नाही हे माहिती असतानाही ती गोष्ट परत मिळणे या आशेवर राहणं यामुळे कधीच प्रत्यक्षात न येणाऱ्या अपेक्षा वाढतात.  एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या रिलेशनशिपबाबतही मत्सर वाटू शकतो. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष ठेवणंही थांबवा. नेहमीप्रमाणे मित्रमैत्रिणींच्या संगतीत सामान्य आयुष्य जगा. एकटं राहू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. यामुळे समस्या अधिक वाढेल” “ब्रेकअपमुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघते हे लक्षात ठेवा आणि आशा सोडू नका. जर एखाद्या अपराधीपणासारखं वाटत असेल, या भावनेतून बाहेर पडता येत नसेल, स्वतःचं काहीतरी बरंवाईट करण्याचे विचार येत असतील तर मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा”, असा सल्ला डॉ. मर्चंट यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात