Home /News /lifestyle /

बापरे! तुम्हालाही 'ही' लक्षणं जाणवत असतील तर आताच सोडा डायटिंग; अन्यथा होतील गंभीर परिणाम

बापरे! तुम्हालाही 'ही' लक्षणं जाणवत असतील तर आताच सोडा डायटिंग; अन्यथा होतील गंभीर परिणाम

डायटिंग तुमच्यासाठी ठरू शकते घातक

डायटिंग तुमच्यासाठी ठरू शकते घातक

अनेकदा डाएटिंगची सवय लागते आणि ही सवय त्रासदायकही ठरू शकते.

    मुंबई, 08 डिसेंबर: आपल्यापैकी अनेक जण डाएट (Diet) करत असतील. सध्या तर डाएट अगदीच ट्रेंडिंग आहे. कधी वजन कमी करण्यासाठी (Weight Loss), कधी हेल्दी वेट मेंटेन (Weight Maintain) करण्यासाठी, तर कधी आणखी काही कारणासाठी डाएट केलं जातं; पण अनेकदा डाएटिंगची सवय लागते आणि ही सवय त्रासदायकही ठरू शकते. याबद्दलची माहिती झी न्यूजने दिली आहे. तुम्ही डाएटच्या अगदी अधीन झाला आहात आणि त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (Physical and Mental Health) परिणाम होत आहे असं लक्षात आलं, तर ताबडतोब डाएट सोडून द्या असा सल्ला दिला जातो. त्यामुळे डाएट कधीपर्यंत केलं पाहिजे हे जाणून घेऊ या. वजन कमी करणं आणि डाएट हे काही जणांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. इतकं, की या विषयाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. त्यामुळे जेव्हा डाएटशी संबंधित त्यांनी ठरविलेली ध्येयं गाठली जात नाहीत, तेव्हा त्यांना मानसिक त्रासही (Mental Illness) होऊ शकतो. अशा व्यक्तींना अपयश, (Failure) तणाव, चिंता आणि नैराश्यानं गाठलं जातं. डाएटिंग आणि वजन वाढण्याची चिंता हे खाण्याच्या विचित्र सवयींशीही (Disordered Eating Habits) निगडित आहे. तज्ज्ञांच्या मते डाएटिंगची सवय तुमच्यासाठी टॉक्सिकही बनू शकते. त्यामुळे Body Dysmorphia, Disordered Eating आणि अन्य मानसिक आजारही जडू शकतात. लक्ष द्या! रडू आल्यास अश्रूंना वाट करून द्या मोकळी; थांबवून ठेवल्यास होऊ शकतात आजार काही व्यक्ती बराच काळ एका विशिष्ट प्रकारचं डाएट फॉलो करतात किंवा बराच वेळ उपाशी राहतात. लक्षात ठेवा, या सवयींमुळे त्रास होऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर पडतो. तुम्हाला खाताना लाज वाटत असेल किंवा अपराधी वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही डाएटच्या आहारी गेला आहात म्हणजेच ॲडिक्ट झाला आहात. काही जणांना तर खातानाच आपण हे खात आहोत या विचारानं भयंकर अपराधी वाटायला लागतं. किंवा खाऊन झाल्यानंतर आपण हे का खाल्लं असा पश्चाताप होतो. प्रमाणापेक्षा जास्त डाएटिंग केलंत, तर भूक लागल्यावर चहा, कॉफी, निकोटिन किंवा पाणी पिऊन ती भूक दाबण्याची सवय लागते. अर्थातच या सवयीमुळेही त्रास होतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या शरीराबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करायला लागलात तर त्यापासून सावधान राहा. कारण हाच तुम्ही डाएटच्या अति आहारी गेल्याचा संकेत आहे. त्यामुळे वजन संतुलित ठेवण्यासाठी, कमी करण्यासाठी, चांगल्या तब्येतीसाठी डाएट नक्की करा; पण प्रमाणातच आणि तेही तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच करा.
    First published:

    पुढील बातम्या