मोजे सतत वापरल्यामुळे त्याला दुर्गंध यायला सुरुवात होते. मुलांसोबत असं अनेकदा होतं. धूळ आणि घाणीच्या संपर्कात आल्याच्या ठराविक वेळेनंतर मोजो काळे पडू लागतात. जर तुमचे मोजेही काळे पडत असतील आणि त्यातून वास येत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहोत ज्यामुळे मोज्यातली दुर्गंधी दूर होईल.
एक लीटर पाण्यात 2 चमचे मीठ टाका. त्यात मोजे भिजवत ठेवा. जर तुमचे मोजे खराब झाले असतील तर त्यात डिटरजन्टही घालू शकता. लक्षात ठेवा की पाणी फार गरम असू नये, नाही तर मोज्यातले इलॅस्टिक खराब होईल. या उपायने मोज्यातून येणारा दुर्गंध दूर होईल.
पांढऱ्या मोज्यांना धुण्यासाठी हायड्रोजन परऑक्साइडचा वापर करू शकता. हे मोजे साफ तर करतातच शिवाय दुर्गंधीलाही दूर करतात.
एक लीटर कोमट पाण्यात चतुर्थांश कप हायड्रोजन परऑक्साइड मिसळून त्यात काही वेळासाठी मोजे भिजवत ठेवा. यानंतर ते मोजे डिटरजन्टने धुवून काढा.
बेकिंग सोडाही मोज्यातील दुर्गंधी दूर करू शकतो. पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून त्यात मोजे भिजवत घाला. मोज्यावरील काळे डाग निघून जातात.
लिंबात अॅसिड असतं जे मोज्यातील दुर्गंध दूर करतं. एक लीटर पाण्यात लिंबाचा रस घालून मोजे धूवा. यामुळे मोज्यातली दुर्गंधीही निघून जाईल.
WHITE VINEGAR मुळेही मोज्यातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. अर्ध्या लीटर पाण्यात एक कप WHITE VINEGAR घाला. यात तुम्ही डिटरजन्टही घालू शकता. असं केल्याने मोज्यातली घाण आणि दुर्गंधी दूर होते.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.