मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Diabetes : शुगर कंट्रोल करायची आहे? मग जेवणानंतर एक काम करावचं लागेल

Diabetes : शुगर कंट्रोल करायची आहे? मग जेवणानंतर एक काम करावचं लागेल

शुगर कंट्रोल करायची आहे? मग जेवणानंतर एक काम करावचं लागेल

शुगर कंट्रोल करायची आहे? मग जेवणानंतर एक काम करावचं लागेल

Diabetes care tips : जर तुम्हाला तुमची शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवायची असेल तर येथे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 सप्टेंबर : लाईफस्टाईल बदलल्यामुळे (Lifestyle Changes) जगणं सोपं झालं, पण आरोग्य बिघडत राहिलं. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, वेळा यांच्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळालं. डायबेटिस (Diabetes) हा त्यातला एक गंभीर आजार आहे. खरं तर या आजाराचे लगेचच काही परिणाम शरीरावर जाणवत नाहीत. मात्र, हळूहळू शरीर खंगत जातं. शरीरातील इतर अवयवांवर यामुळे परिणाम होतो. प्रतिकारशक्ती कमी होते यामुळे आणखी वेगवेगळे आजार ग्रासतात. डायबेटिस कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्याचा महत्त्वाचा सल्ला डॉक्टर देतात. त्याशिवाय डायबेटिसवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही टिप्स (Tips To Control Diabetes) नक्की उपयोगी पडतात.

रक्तातल्या साखरेचं प्रमाण ठराविक मर्यादेबाहेर रहायला लागलं आणि ते कमी होत नसेल तर डायबेटिस झाला असं निदान डॉक्टर करतात. त्याचं कारण असं असतं की शरीरातील साखरेचं विघटन करणारा स्राव इन्शुलिन याची निर्मिती कमी झालेली असते. साखर विघटित न झाल्यानेच तिचं रक्तातलं प्रमाण वाढतं. मग डायबेटिस नियंत्रणासाठी ट्रिटमेंट घ्यावी लागते. आहार व रोजच्या जगण्यातील सवयींमध्ये काही बदल केले तर डायबेटिसवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.

- आहारामध्ये बटाटा आणि भात हे पिष्टमय (Avoid Carbohydrates) पदार्थ सर्वांत आधी कमी करा. यामुळे टाईप 2 डायबेटिस नियंत्रणात राहील. डायबेटिसचं निदान झाल्या-झाल्या लगेचच आहारातील पथ्य सुरु केली तर पुढील धोके टळतात.

- डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवण झाल्यावर 5 मिनिटे चालणं (Walk For 5 Minutes After Meal) फायदेशीर ठरू शकतं. आहारातील पिष्टमय पदार्थांमुळे शरीरात ग्लुकोज वाढतं. चालल्यामुळे ते पुन्हा कमी होण्यास थोडी मदत होते.

वाचा - गर्भधारणा, मधुमेह आणि तुमचे डोळे यांच्यातील जिज्ञासू संबंध

- डायबेटिस असलेल्या रुग्णांनी आहारात बीन्स, कोबी, फ्लॉवर या भाज्या घ्याव्यात. जेवणातील ¼ भाग प्रथिनांचा (Proteins) असला पाहिजे. मासे, चिकन, सोया यांचा यात समावेश करता येऊ शकतो.

डायबेटिस हा आजार काही वेळा अनुवंशिकही असतो. अशा लोकांनी आधीपासूनच खबरदारी घेणं गरजेचं असतं. जीवनशैलीतील बदलांमुळे मानसिक ताण (Mental Stress Is One Of The Reason) वाढला आहे. याचाही थेट परिणाम डायबेटिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो. अतिचिंता, काळजी व सततचा ताण यामुळे डायबेटिस होऊ शकतो. त्यासाठी जीवनशैलीमध्ये चांगले बदल केले पाहिजेत. चांगला व सकस आहार घेणं, वेळेवर जेवण करणं, पुरेसा व्यायाम करणं, नियमित चेकअप करणं, ताणतणावापासून दूर राहणं या काही गोष्टी केल्या तर डायबेटिसला दूर ठेवणं शक्य होऊ शकेल.

डायबेटिस पेशंट्सनी आहारातून भात आणि बटाटा वर्ज्य करावा, मात्र हे करताना काही वेळा रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते, याचंही भान ठेवलं पाहिजे. डायबेटिसच्या रुग्णांना गोळ्याही सुरु असतात व आहारातील पथ्यही असतात. त्याचा समतोल साधणं गरजेचं असतं. डायबेटिसचं निदान झाल्या-झाल्या चांगली पथ्य पाळली, व्यायाम केला (Exercise For Sugar Control) तर डायबेटिसवर पूर्ण नियंत्रणही मिळवता येऊ शकतं. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes