जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डेहराडूनची मुस्कान ‘खास’ मित्राला ठेवते सतत सोबत; पार्टनर ‘चूचू’ आहे तिच्या कुटुंबाचाच एक सदस्य

डेहराडूनची मुस्कान ‘खास’ मित्राला ठेवते सतत सोबत; पार्टनर ‘चूचू’ आहे तिच्या कुटुंबाचाच एक सदस्य

dehradun muskan

dehradun muskan

मुस्कानच्या घरी असलेला चूचू हा छोटा पक्षी उडू शकत नाही. त्याच्या पंखांमध्ये काही समस्या असल्यानं त्याला उडता येत नसल्याचं ती सांगते.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : आपल्या आजूबाजूला अनेक प्राणिप्रेमी असतात. काही जण घरी कुत्रा, मांजर असे प्राणी पाळतातही. हे प्राणी त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग होऊन जातात. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. त्यांच्यासोबत सहलीलाही जातात. असं असलं, तरी एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्याला 24 तास सोबत ठेवणं काही शक्य नसतं. डेहराडूनची मुस्कान बत्रा मात्र तिच्या ‘चूचू’ नावाच्या पक्ष्याला कायम सोबत ठेवते. त्याच्या पंखांमध्ये काही समस्या असल्यानं तो उडू शकत नाही. त्यामुळे तो सतत तिच्या खांद्यांवर बसून तिच्यासोबत फिरतो. त्यांची ही घट्ट मैत्री अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरलीय. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये राहणाऱ्या मुस्कान बत्राची तिच्या नव्या दोस्तामुळे खूप चर्चा होते आहे. गेल्या 10 महिन्यांपासून ती एका छोट्या पक्ष्याला सांभाळते आहे. त्याचं नाव तिनं चूचू असं ठेवलंय. आता त्या दोघांची घट्ट मैत्री झालीय. Hair Care Tips : केस घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी अशा प्रकारे वापरा सी सॉल्ट, वाचा फायदे   मुस्कानच्या घरी असलेला चूचू हा छोटा पक्षी उडू शकत नाही. त्याच्या पंखांमध्ये काही समस्या असल्यानं त्याला उडता येत नसल्याचं ती सांगते. त्यामुळे तो दिवसभर तिच्या खांद्यावर बसून सगळीकडे फिरतो. सकाळी उठल्या उठल्या चूचूला पाहिल्याशिवाय तिचा दिवस सुरू होत नाही, असं मुस्कान सांगते. त्याला पाहून मगच ती रोजची कामं करायला सुरुवात करते. ती कामासाठी बसल्यावर तिथेही चूचू असतोच. त्याच्यासाठी टेबलवर खास सोय तिनं केली आहे. मुस्कान काम करते, तेव्हा चूचू दाणे खात तिथं बसतो. चूचूला पनीर आणि संत्रं खूप आवडतं, असं मुस्कान सांगते. इतकंच नाही, तर तिच्यासोबत तो कुरकुरे, चिप्स आणि नमकीनही आवडीनं खातो असं ती सांगते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मुस्कान तिच्या दोस्तासाठी खूप गोष्टी करते. आता लवकरच त्याचा वाढदिवस येणार आहे. त्याचाही तिनं विचार केला आहे. माणसाप्रमाणेच प्राणी-पक्ष्यांनाही देवानंच निर्माण केलंय. त्यांच्यातही माणसासारख्या भावना असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे असं मुस्कानचं म्हणणं आहे. त्यांना वेळच्या वेळी खायला देणं, मोकळ्या हवेत त्यांना जगू देणं, आजारी पडल्यास त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं व औषधोपचार करणं महत्त्वाचं असल्याचं ती सांगते. ‘चूचू’शी तिची चांगली मैत्री झाली आहे. हा ऑस्ट्रेलियन बर्ड आहे. त्याला इंग्रजीत Budgeriger असं म्हणतात, तर हिंदीत त्याला बजी असं म्हणतात. हा मेलोप्सिटाकस प्रजातीचा पक्षी आहे. जॉन गोल्ड यांनी 1840मध्ये त्याचं नामकरण केलं होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात