Home /News /lifestyle /

OMG! सोनं-चांदी, पैसे नाही तर 21 विषारी साप; सासरी जाणाऱ्या मुलीला दिला जातो विचित्र हुंडा

OMG! सोनं-चांदी, पैसे नाही तर 21 विषारी साप; सासरी जाणाऱ्या मुलीला दिला जातो विचित्र हुंडा

हुड्यांमध्ये (dowry) सोनं, चांदी, दागिने, पैसे, गाडी, घर कशाचीही मागणी केली जाते. पण कधी हुंड्यात साप (snake in dowry) दिल्याचं ऐकलं आहे का?

    भोपाळ, 27 जानेवारी : हुंडा (dowry) देणं आणि घेणं तसं गुन्हाच आहे. पण आजही कित्येक ठिकाणी हुंडा घेतला जातो. सासरी येणारी मुलगी सोन्याचे दागिने घालून येईल, पैशांच्या रूपात लक्ष्मी घरात आणेल अशी स्वप्नं सासरच्या मंडळींनी रंगवलेली असतात. हुड्यांमध्ये सोनं, चांदी, दागिने, पैसे, गाडी, घर कशाचीही मागणी केली जाते. पण कधी हुंड्यात साप (snake in dowry) दिल्याचं ऐकलं आहे का? सर घरी येणारी सून सोन्या-चांदीच्या दागिन्यांऐवजी आणि पैशांच्या पेटीऐवजी साप घेऊन आली तर काय अवस्था होईल. ही कोणतीही काल्पनिक कथा नाही. तर प्रत्यक्षात साप हुंडा म्हणून दिला जातो. ही प्रथा आहे मध्य प्रदेशातील (madhya pradesh). इथल्या एका समाजात मुलींना सासरी जाताना 21 विषारी साप दिले जातात. मध्य प्रदेशमधील गौरेया समाज. या समाजातील मुली लग्न करून सासरी जाताना 21 विषारी साप घेऊन जातात. माहेरून हुंडा म्हणून त्यांना हे साप दिले जातात. जर असं नाही केलं तर मुलीचं लग्न मोडू शकतं, ती लग्नानंतर आनंदी राहणार किंवा काही अघटित घडू शकतं, असा या समाजाचा समज आहे. हे वाचा - कमी वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडली महिला; असं सत्य समोर आलं की बसला मोठा धक्का परंपरेनुसार गौरेया समाजातील लोक मुलींना सासरी पाठवताना गहुआ आणि डोमी प्रजातीचे साप हुंड्यात देतात. हे साप खूप विषारी असतात. एकदा जरी हे साप चावले तर माणूस मरतोच. महत्त्वाचं म्हणजे हे साप पकडण्याची जबाबदारी ज्या मुलीचं लग्न होणार आहे तिच्या वडिलांची असते. मुलीचं लग्न ठरल्यानंतर तिचे वडील साप पकडण्याची तयारी करतात. गौरेया समाजातील लोकांचं कामच साप पकडण्याचं आहे. त्यामुळे हुंड्यात मिळणारे साप त्यांच्या उपजीविकेचं एकप्रकारे साधनच आहे. सापांचा खेळ दाखवून किंवा त्याचं विष विकून हे लोक पैसे कमवतात. हे वाचा - सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे गुपचूप करतेय लग्न? PHOTO VIRAL या लोकांमध्ये सापाबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न वनविभाग खूप आधीपासून करत आहे. पण तरी सध्या ही प्रथा सुरूच आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Madhya pradesh, Snake, Viral

    पुढील बातम्या