मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कमी वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडली महिला; असं सत्य समोर आलं की बसला मोठा धक्का

कमी वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडली महिला; असं सत्य समोर आलं की बसला मोठा धक्का

45 वर्षांची महिला 24 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी तिनं आपलं आधीचं लग्नही तोडलं.

45 वर्षांची महिला 24 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी तिनं आपलं आधीचं लग्नही तोडलं.

45 वर्षांची महिला 24 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी तिनं आपलं आधीचं लग्नही तोडलं.

वॉशिंग्टन, 26 जानेवारी : आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं तसं काही नवं नाही. कित्येक महिला अगदी आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणांशीही लग्न करतात. पण प्रत्येक वेळी अशी लव्हस्टोरी यशस्वी ठरेलच असं नाही. असंच काहीसं झालं ते अमेरिकेतील (America)  एका महिलेसोबत. 45 वर्षांची ही महिला 24 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि जेव्हा त्याचं सत्य समोर आलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला.

अमेरिकेच्या नॉरफोकमध्ये (Norfolk) राहणारी 45 वर्षांची जोआना गर्लिंग (Joanna Girling). आपल्या पतीसोबत 2001 साली सुट्ट्यांमध्ये इजिप्तमध्ये (Egypt) एका रिसॉर्टमध्ये जायची. 2018 तिथं गेली असता तिथं तिची भेट 24 वर्षांच्या हसन खालिदसोबत झाली. (Hassan Kahlied). हसन तिथं वेटर होता. पहिल्या नजरेचं तिचं त्याच्यावर प्रेम जडलं.

जोआनाचं तिच्या पतीसोबतही तसं काही फारसं पटत नव्हतं त्यामुळे ती सहजपणे हसनकडे आकर्षित झाली. हसन तिच्यासोबत फ्लर्टही करायचा. तिला चांगलं कसं वाटेल यासाठी प्रयत्न करायचा. त्यामुळे त्याच्याशी नातं जोडावं असं वाटलं. असं तिनं मुलाखतीत सांगितलं. जेव्हा ती नॉरफोकला परत आली तेव्हा तिनं आपलं 20  वर्षांचं लग्न मोडलं आणि इजिप्तला हसनकडे गेली.

हे वाचा - सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे गुपचूप करतेय लग्न? PHOTO VIRAL

काही महिन्यांनंतर हसननं जोआनचे 1500 पाउंड म्हणजे जवळपास दीड लाख रुपये आपल्याकडे ठेवलं. आपल्याकडे पुरुषांकडे पैसे ठेवण्याची पद्धत असल्याचं त्यानं तिला सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी जोआनाला पुन्हा तिच्या घरी म्हणजे नॉरफॉकला पाठवलं आणि दोघांच्या भविष्यासाठी पैसे जमवायला सांगितलं.

जोआना नॉरफोकला परतली. तेव्हा तिला हसननं मेसेज केला, त्यानं तिच्याशी ब्रेकअप केलं. तू लठ्ठ आणि म्हातारी आहेस असं कारण त्यानं दिलं. शिवाय इजिप्शिअन महिलेशी तो लग्न करत असल्याचंही त्यानं सांगितलं.

जोआना म्हणाली, "मला वाटलं हसन माझ्यावर प्रेम करतो, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. पण आता मला समजलं त्यानं हे सर्वकाही फक्त पैशांसाठी केलं. त्याला फक्त माझे पैसे हवे होते. मी किती मूर्ख आहे. कारण हसनसाठी मी माझं वैवाहिक आयुष्यही संपवलं"

हे वाचा - नवऱ्याला स्वप्न पडलं आणि बायकोचं नशीब फळफळलं; 437 कोटी रुपयांची मालकीण झाली

जोआना पुन्हा इजिप्तमध्ये गेली आणि आता ती 38 वर्षांच्या हायसम फेयगोच्या प्रेमात पडली. आता दोघंही खूश आहेत. त्यानं आपल्याकडे कधीच मागितले नाहीत असं तिनं सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Breakup, Love story, Relationship, World news