जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्ही दररोज 4 तासांहून अधिक टीव्ही बघता? आधी वाचा या Research चा निष्कर्ष

तुम्ही दररोज 4 तासांहून अधिक टीव्ही बघता? आधी वाचा या Research चा निष्कर्ष

तुम्ही दररोज 4 तासांहून अधिक टीव्ही बघता? आधी वाचा या Research चा निष्कर्ष

दररोज 4 तासांपेक्षा अधिक टीव्ही पाहणाऱ्यांच्यात रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण वाढतं, असा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जानेवारी -  TV watching linked with potentially fatal blood clots : जास्त काळ टीव्ही पाहिल्यानं नुकसान होतं हे पूर्वीपासूनच आपल्याला सांगितलं जात आहे. परंतु दररोज अडीच तासाच्या तुलनेत चार किंवा त्याहून अधिक तासांपर्यंत टीव्ही पाहिल्यास रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका 35% पर्यंत वाढतो, असं ब्रिटनमधल्या वैज्ञानिकांना एका नव्या संशोधनात आढळलं आहे. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल (University of Bristol) च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 1 लाख 31 हजार 421 लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या लोकांमध्ये व्हीटीआयची समस्या नव्हती. या अभ्यासात टीव्ही पहाणं आणि व्हीटीआय म्हणजेच वेनस थ्रोंबेबोलिज्म (venous thromboembolism) या दोन्हीदरम्यानच्या संबंधांबद्दल निरक्षण करण्यात आलं.

 हे वाचा  अंड्यासह खाताय हे पदार्थ? विविध आजारांना द्याल निमंत्रण, वेळीच घ्या काळजी

व्हीटीआयमध्ये पल्मोनरी इंबोलिज्म (pulmonary embolism) म्हणजेच फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गाठी आणि ब्रेन थ्रोंब्रोसिस (brain thrombosis) चा समावेश असतो. वेन थ्रोंबोसिसमध्ये शिरांमध्ये रक्ताच्या गाठी बनण्याचा (विशेषतः पायामध्ये) धोका असतो. त्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे पल्मोनरी इंबोलिज्मची शक्यता निर्णाण होते. या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपीयन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी (European Journal of Preventive Cardiology) या नियतकालिकात प्रकाशित झालं आहे. जाणकार काय सांगतात युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल (University of Bristol)शी संबंधित स्टडीमध्ये प्रमुख रायटर डॉ. सेटर कुनट्सर (Dr Setor Kunutsor) यांच्या माहितीनुसार, शारीरिकरित्या क्रियाशील राहिल्यानंतरही दीर्घकाळ टीव्ही पाहिल्यानंतर रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका कमी करता येऊ शकत नाही. टीव्ही पाहताना मध्ये ब्रेक घेणं आवश्यक आहे. अर्धा तासाच्या अंतरात उभे राहून स्ट्रेचिंग करावं. टीव्ही पाहताना जंक फूड अथवा फास्टफूड खाऊ नये. दीर्घकाळापर्यंत टीव्ही पाहणारे आणि कधीच नाही किंवा कधी कधी टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये व्हीटीआय विकसित करण्याच्या सापेक्ष जोखमीचं विश्लेषण संशोधकांनी केलं आहे. कधी टीव्ही न पाहणाऱ्यांच्या तुलनेत दीर्घकाळापर्यंत टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये व्हीटीआय विकसित होण्याची शक्यता 1.35 अधिक होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात