मुंबई, 24 मार्च : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. सध्या अशाच एका बाळाचा व्हिडीओ (kids video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये गायिका असलेली आई गाण्याचा रियाज करत असताना तिच्या मांडीवर बसलेलं बाळही तिच्या सुरात सूर मिसळताना दिसतं आहे. आई आणि बाळाच्या (mother kids singing) या गोड जुगलबंदीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे.
सोशल मीडियावर लहान मुलांचे बरेच मजेशील व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पोट धरून हसवणारे असतात जर काही व्हिडीओ चेहऱ्यावर गोड हसू आणणारे असतात. असाच हा व्हिडीओ आहे. जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. आई आणि तिचं बाळ दोघंही एकत्र गाण्याचा रियाज करताना दिसत आहेत.
A lovely Jugalbandi to make your morning beautiful.
Vidoe via @Raaggiri pic.twitter.com/eoloUr3Wsh — Arun Bothra (@arunbothra) March 23, 2021
हा व्हिडीओ आहे मराठी गायिका प्रियांका बर्वेचा (Singer Priyanka barve) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिच्या या मुलाचा जन्म झाला होता. त्याचं नाव युवान आहे. युवानला अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नाही. पण तो आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवताना दिसत आहे. व्हिडीओत पाहू शकता युवान प्रियांकाच्या मांडीवर बसला आहे. प्रियांका जेव्हा गायला सुरुवात करते. तेव्हा युवानसुद्धा सूर छेडतो. आई गाते तेव्हा बाळसुद्धा गाऊ लागतं.
हे वाचा - फोटो काढणाऱ्या बापलेकीला पाहून पिसाळला हत्ती; मागून आला आणि... धक्कादायक VIDEO
हा व्हिडीओ प्रत्येकाला आवडला आहे. त्यावर मजेशीर आणि प्रेमळ अशा प्रतिक्रियाही येत आहे. आयपीएएस अधिकारी अरुण बोथरा (Arun Bothra) यांनी का व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना प्रेमळ जुगलबंदी असं कॅप्शन दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mother, Parents and child, Small child, Viral videos