मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धोक्याची घंटा! कोरोना संसर्गाने पुन्हा वाढवली चिंता; 10-11 एप्रिलला देशभरात मॉक ड्रिल

धोक्याची घंटा! कोरोना संसर्गाने पुन्हा वाढवली चिंता; 10-11 एप्रिलला देशभरात मॉक ड्रिल

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Coronavirus in India: आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, टेस्टींग आणि लक्षणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 मार्च : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाव्हायरस आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. या अ‍ॅडव्हायझरीमध्ये लोकांना कोविडसाठी निश्चित केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या आणि बंदीस्त ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/ टिश्यू वापरण्यास सांगितले आहे. स्वच्छता राखण्यासाठी साबणाने किंवा वारंवार हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, टेस्टींग आणि लक्षणांबद्दल लवकर माहिती देण्यास सांगितले आहे. यासोबतच श्वसनाचे आजार असल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता, 10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर याला सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने 27 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मॉक ड्रिलशी संबंधित सर्व माहिती शेअर केली जाणार आहे.

मागील 146 दिवसांत सर्वाधिक प्रकरणे समोर

शनिवारी भारतात कोविड-19 चे 1,590 नवीन रुग्ण आढळून आले, जे गेल्या 146 दिवसांतील सर्वाधिक आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8,601 वर पोहोचली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात तीन आणि कर्नाटक, राजस्थान आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,30,824 वर पोहोचली आहे.

वाचा - यकृत तंदुरुस्त ठेवण्यासाठी 4 गोष्टी आहारात असायलाच हव्यात

आकडेवारीनुसार, दैनंदिन संसर्ग दर 1.33 टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक संसर्ग दर 1.23 टक्के नोंदवला गेला. यासह, भारतात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 4,47,02,257 वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.02 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचे प्रमाण 98.79 टक्के आहे.

कोरोना संक्रमितांमध्ये वाढ होत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएम मोदी म्हणाले की कोविड-19 अजून संपलेला नाही. त्यांनी अधिकाऱ्यांवर जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्यावर भर दिला आणि लोकांकडून कोविड नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona updates