नवी दिल्ली, 23 मार्च : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी मोदी सरकारच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मोदी सरकारने काही नवे प्लॅन आखले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने
(Ministry of Home Affairs ) कोरोनासंबंधी नवीन नियमावली (
Guidelines for effective control of COVID-19) जारी केली आहे.
केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना
Test-Track-Treat protocol वर जास्तीत जास्त भर देण्यास सांगितलं आहे. कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ट्रॅक करणं आणि सर्वांना लवकरात लवकर उपचार पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे वाचा - मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार कोरोना लस
ज्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये RT-PCR टेस्ट कमी होत आहेत, त्यांनी टेस्ट वाढवाव्यात. 70 टक्के आणि त्यापेक्षा जास्त चाचण्या केल्या जाव्यात. नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लगेच आयसोलेट किंवा क्वारंटाइन करून त्यांच्यावर वेळेत उपचार करावेत. या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध लवकरात लवकर घ्यावा आणि त्यांनाही आयसोलेट आणि क्वारंटाइन करावं.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले लोक यानुसार जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार करावेत. त्यांची यादी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारच्या वेबसाईटवर द्यावी. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयालादेखील ही यादी द्यावी.
हे वाचा - 'या' राज्यात 81% नमुने UK corona varient पॉझिटिव्ह; तरुणांमध्ये धोका वाढला
कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना नियमांची कठोरात कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही जिल्हा, पोलीस आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी असेल. 1 एप्रिल, 2021 पासून नवे नियम लागू होणार आहेत. 30 एप्रिल, 2021 पर्यंत त्यांची अंमलबजावणी करणं बंधनकारक असेल, असंही केंद्राने सांगितलं आहे.
भारतात सध्या कोरोनाच्या एकूण 1,16,86,796 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,60,166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,11,81,253 रुग्ण बरे झाले आहेत. तर आता 3,45,377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.