सध्या अनेक जोडपी दुसऱ्या बाळाचा विचार करण्याआधी प्लॅनिंग करतात. खरतर आपलं कुटुंब वाढवण्यासाठी कोणतीही वेळ योग्य किंवा चुकीची नसते परंतु दुसरे मुलं झाल्यास जोडप्याच्या जबाबदाऱ्या आणखीन वाढतात. जर तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करत असाल तर यापूर्वी तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. जोडीदाराशी बोला : दुसऱ्या बाळाचा विचार करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोला. असे होऊ शकते की तुम्हाला दुसरं बाळ करण्याची इच्छा आहे पण तुमच्या जोडीदाराला तसे वाटत नाही. फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी दोघांचे ही मत एक असेल पाहिजे. जर तुमचा जोडीदार दुसऱ्या बाळासाठी तयार नसेल तर याविषयी तुमच्या जोडीदारासोबत संवाद साधा. पुरुषांनो दाढी वाढवण्यासाठी करा या 5 गोष्टींचा वापर, दिसाल एकदम हँडसम पहिले मुलं समजदार आहे का? जर तुमचं पहिलं मूल खूप लहान असेल आणि त्याला तुमची सतत गरज असेल, तर तुम्हाला दुसरं मूल सांभाळणं कठीण होऊ शकतं. तेव्हा तुमचे बाळ आपल्या भावंडांचे स्वागत करण्यास तयार आहे की नाही हे लक्षात घ्या.
आर्थिक स्थिती : आपल्या मुलांना चांगले आयुष्य द्यावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या स्थिर असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची सध्याची आर्थिक स्थिती बरोबर नसेल तर तुम्ही तुमचे नियोजन काही काळ लांबवणे योग्य ठरू शकेल.