मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! खूप दिवसांपासून येतोय खोकला? हा दमा तर नाही ना? ही आहेत इतर लक्षणे

सावधान! खूप दिवसांपासून येतोय खोकला? हा दमा तर नाही ना? ही आहेत इतर लक्षणे

दम्याचा परिणाम व्यक्तीच्या फुफ्फुसांवर होतो. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अधिक त्रास होत असतो. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून सतत खोकला येत असेल (Symptoms Of Asthma) तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

मुंबई, 10 जुलै : बदलत्या ऋतूमध्ये खोकला येणे सामान्य आहे. अनेकदा ताप किंवा सर्दी खोकला (Old Cough Problem) होऊ शकतो. जो सामान्य औषधांनी बरा होऊ शकतो. परंतु, दीर्घकाळ टिकणाऱ्या खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ते दम्याचे लक्षण (Symptoms Of Asthma) असू शकते. दम्याचा त्रास होण्याचे लक्षण म्हणजे श्वसनमार्गात जळजळ होणे. दमा होण्यासाठी विशिष्ट वय नसते. हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला त्रास देऊ शकतो. दम्याचा आजार व्यक्तीच्या फुफ्फुसांवर होतो, त्यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास होतो.

अस्थमा व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवतो. त्यामुळे कोणतीही शारीरिक क्रिया करताना खूप त्रास होऊ शकतो. अस्थमा श्वासनलिकेच्या अस्तराच्या जळजळीमुळे त्याच्या सभोवतालचे स्नायू घट्ट होतात (Asthma Problems) आणि श्लेष्मा श्वासनलिका बंद करतात. ज्यामुळे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. खोकला आणि छातीत घट्टपणा सुरू होतो. अशा स्थितीला दम्याचा झटका म्हणतात.

ही आहेत दम्याची लक्षणे

- दम्याचे सर्वात सामान्य आणि सुरुवातीचे लक्षण म्हणजे अस्वस्थता. दम्याचा त्रास असलेल्या लोकांना श्वास घेताना त्यांच्या घशातून विचित्र कर्कश किंवा शिट्ट्याचा आवाज येतो आणि त्याना अस्वस्थ वाटते.

- हेल्थ लाईननुसार, दम्याच्या रुग्णांना खोकल्याची समस्या नेहमीच असू शकते आणि ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी, हसताना आणि कधीकधी व्यायाम करताना वाढते.

- दम्यामध्ये रुग्णाला छातीत घट्टपणा जाणवतो.

- दम्यामध्ये छाती जड झाल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा शारीरिक काम करताना ही समस्या वाढू शकते.

- दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला बोलण्यात अडचण येते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

- दम्यामध्ये शरीराला सतत थकवा जाणवतो.

- कधी कधी दम्याचा झटका आल्याने किंवा जास्त खोकल्यामुळे छातीत तीव्र वेदना होतात आणि व्यक्ती वेगाने श्वास घेऊ लागते.

- दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला जास्त झोप येऊ शकते.

- अस्थमा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील परिणाम करू शकतो. ज्यामुळे शरीराला वारंवार संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle