कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी कोणताही ठोस उपचार अद्याप शोधण्यात आलेला नाही. पण कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी काही प्राथमिक उपाय करणे आवश्यक आहे.
miami.cbslocal.com च्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी मास्कपेक्षा जास्त स्वच्छ पाण्याने हात धुणे हा प्रभावशाली उपाय आहे.
COVID-19 च्या संक्रमणापासून वाचण्यासाठी हात स्वच्छ पाणी आणि साबणाने धुणे आवश्यक आहे. कमीतकमी 20 सेकंद किंवा त्याहून जास्त वेळेसाठी हात साबण आणि पाण्याचा वापर करून धुणे अपेक्षित आहे.
तुम्ही बाहेर असाल आणि साबण-पाण्याचा वापर अशक्य आहे, तर अशावेळी सॅनिटायझरचा वापर करा. सर्वात जास्त प्रभावी असणाऱ्या 60 टक्के अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करा.
व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी वारंवार तुमचे डोळे, नाक, तोंड आणि चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा
जर तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची लक्षणं दिसू लागली तर त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा