नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) संकटाचा सामना करताना बहुतेक जण घरात आहेत. त्यात आता उकाड्यानेही हैराण केलं आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी एसी (AC) आणि कूलरचा (Cooler) वापर केला जातो आहे. पण गारवा मिळवता मिळवता तुम्ही कोरोनाव्हायरसला तर तुमच्या घरात जागा देत नाहीत नाही, हे पाहा. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणू हा एअरबॉर्न आहे. म्हणजेच तो हवेतून पसरतो. त्यामुळे एसी कॅब बसेस, वातानुकुलित शॉपिंग मॉल्स किंवा थिएटर्स आदी ठिकाणी हा संक्रमित ड्रॉपलेटच्या माध्यमातून हवेत बराच काळ राहू शकतो. परिणामी क्रॉस व्हेटिंलेशन नसल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो आणि तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न येता ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता. त्यामुळे कोरोना काळात एसी आणि कूलर वापरताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर घरात कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर फॉरडिसीज कंट्रोलने याबाबत मार्गदर्शन केलं आहे. आम्ही घरी सुरक्षितपणे एअर कंडिशन (Air Condition) कसा वापरू शकतो? -घरात एसी (AC) वापरताना त्याचं तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावं. - रोगजंतूमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी 40 ते 70 टक्के आर्द्रता पातळी ही सर्वात योग्य मानली जाते. - खोलीतील वातानुकूलित थंड हवा रिसर्क्युलेट होण्यासाठी खोलीतील खिडकीची दारं थोडीशी उघडी ठेवावीत. यामुळे घरात साठलेली हवा बाहेर जाऊन नैसर्गिक हवा घरात खेळती राहिल. हे वाचा - तुम्हाला मोफत कोरोना लस मिळणार का? राज्य सरकारआधी BMC ने घेतला मोठा निर्णय - घरात संसर्ग झालेली व्यक्ती आणि संसर्ग नसलेल्या व्यक्ती एकत्र राहत असतील तर सेंट्रल वातानुकुलित यंत्रणेचा (Centralise AC) वापर टाळावा. प्रत्येक खोलीत स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा असावी. रूम कूलर्सचा (बाष्पीभवन होणारे कुलर्स) वापर करावा का? - हो, करू शकता. चांगल्या व्हेन्टिलेशनसाठी इव्हॅपोरेटिव्ह (Evaporative Coolers) म्हणजे बाष्पीभवन होणाऱ्या कूलर्सचा वापर करावा. कारण या कूलर्सच्या बाजूच्या भागातून हवा बाहेर पडते. - या कूलरचा टॅंक स्वच्छ आणि संसर्ग विरहित ठेवावा. यातील पाणी सातत्याने बदलावं. - खोलीतील आर्द्रतायुक्त हवा बाहेर जाण्यासाठी खिडकीची दारं उघडी ठेवा. - यासाठी बाह्य हवा न आणणाऱ्या पोर्टेबल बाष्पीभवन करणाऱ्या कूलर्सची शिफारस केली जात नाही. कारण यामुळे खोलीत आर्द्रता वाढू थंडावा कमी होतो. लक्ष****णं कायम राहिल्यास काय करावं? व्यक्तीपरत्वे कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो. परंतु काळजी करू नये. उपचारांबाबत संबंधित व्यक्तीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आयसोलेशन (Isolation) थांबवण्यासाठी कोणता कालावधी सुरक्षित असतो? याबाबत रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वसाधारणपणे खालील गोष्टींनंतर लोकांच्या संपर्कात पुन्हा येऊ शकता… - गेल्या तीन दिवसांत ताप न आल्यास. - प्रथम लक्षणे दिसल्यानंतर किमान 17 दिवस पूर्ण झाल्यानंतर. हे वाचा - तुम्हालाही करायचंय Oxygen दान? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया - जर तुमची लक्षणे कमी झाली असतील तर, जर तुमची रोगप्रतिकार शक्ती काही अन्य कारणांमुळे पुरेशी वाढली नसेल तर डॉक्टर तुमचा आयसोलेशन कालावधी वाढवू शकतात आणि टेस्टिंग करण्याचा सल्ला देतात. मी ऑ****फिस किंवा दैनंदिन कामे (Daily Routine) कधी सुरू करू शकतो? - प्रथम लक्षणं दिसल्यानंतर किमान 17 दिवस पूर्ण झाल्यानंतर. - लक्षणं पूर्णपणे बरी झाल्यानंतर तसंच ऊर्जास्तर चांगला वाढल्यानंतर. रुग्णाची पहिली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने भीतीमुळे परत टेस्ट केली नाही. तो अद्याप पॉझिटिव्ह असू शकतो का आणि त्याच्यामुळे अन्य लोकांना संसर्ग होऊ शकतो का**?** रुग्णाने आयसोलेशन कालावधी पूर्ण केला असेल आणि रुग्ण आयसोलेशनमधून बाहेर आला असेल तर त्याच्यामुळे अन्य लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. तसंच त्याने पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. मला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का**?** कोविड-19 ची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये त्याची लक्षणं असली किंवा नसली तरी अँटिबॉडी (Antibodies) आणि विषाणूसोबत लढा देणाऱ्या पेशी तयार होत असतात. त्यामुळे एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर संबंधित तुम्हाला साधारण पहिल्या तीन महिन्यांत पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमीच असते. मात्र त्यानंतर अँटिबॉडीजची संख्या कमी झाल्याने संसर्ग होऊ शकतो. कोणतीही लक्षणं नसलेल्या लोकांमुळे संसर्ग पसरू शकतो का**?** हो, कोणतीही लक्षणं नसलेल्या लोकांमुळे विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू शकतो. त्यामुळे संक्रमित सर्व लोकांनी चाचणी,आयसोलेशन आणि आजाराच्या स्थितीनुसार वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणं आवश्यक आहे. या उपायांमुळे आपण कोरोनाची साखळी (Corona Chain) तोडू शकतो. एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अगदी जवळून संपर्कात न येताही मला संसर्ग होऊ शकतो का**?** हो, हे शक्य आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार कोविड हवेत जास्त काळ राहणाऱ्या लहान ड्रॉपलेट्समधून पसरू शकतो. कमी प्रमाणात व्हेंटिलेशन असलेल्या बंदिस्त जागेत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीकडून सूक्ष्म ड्रॉपलेट्स सोडले गेल्यास ते एसीच्या माध्यमातून पसरतात. त्यामुळे अशा ठिकाणीदेखील मास्कचा वापर करणं अत्यावश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







