मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,सध्या शहरांमध्ये दर काही मिनिटांनी अँब्युलन्सचे आवाज काळीज चिरत जात आहेत. प्रत्येक वेळी फोन वाजतो तेव्हा कसली वाईट बातमी तरअसणार नाही ना,असा घोर मनाला लागलेला असतो. ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर येणाऱ्या बातम्या,ओळखीच्या लोकांचं मदतीसाठीचं आवाहन किंवा ओळखीचं कुणी तरी गेल्याचं हादरवून टाकणारं वृत्त अशा सगळ्या गदारोळात आपण सध्या जगतो आहोत. या सगळ्यातच क्रेड ऍपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्रेड (CRED) हे भारतातलं आघाडीचं फायनान्शियल टेक्नॉलॉजी स्टार्टअप असून, ते क्रेडिट कार्ड पेमेंट अॅप (Credit Card Payment App)आहे. मिलाप (Milaap) हा देशातला आरोग्यसेवेसाठी निधी उभारणारा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. क्रेडने मिलापशी सहयोग केला असून, त्या माध्यमातून क्रेडच्या युझर्सना क्रेड कॉइन्स (CRED Coins) मिळतील आणि त्याचा वापर चक्क ऑक्सिजनचं दान(Donate Oxygen)करण्यासाठी करता येऊ शकेल.
क्रेडकडून News18 ला देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक युझरकडून करण्यात आलेल्या दानातून उभा राहिलेला निधी मिलाप त्यांच्या पार्टनर्सकडे पाठवेल. त्यातून हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकरिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले जातील आणि बसवले जातील. या व्यवहारात पारदर्शकताही आहे. 3 मेपासून सुरू होणार असलेल्या या प्रकल्पाबद्दलची आकडेवारी क्रेड अॅपमध्ये दररोज प्रसिद्ध केली जाणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्याचं काम भारतभर कसं सुरू आहे, याचं स्टेटस त्यातून दिसेल.
ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा (Oxygen Cylinder) ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) वापरणं अधिक फायद्याचं आहे. कारण कॉन्सन्ट्रेटरद्वारे थेट हवेतला ऑक्सिजन वेगळा करून नायट्रोजन पुन्हा हवेत सोडून दिला जातो. हा ऑक्सिजन पेशंटसाठी वापरता येतो. ऑक्सिजन सिलिंडर वारंवार भरावे लागतात आणि सध्या देशात त्याचा तुटवडा आहे, हे आपण पाहतोच आहोत. कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग अतिदक्षता विभागातल्या पेशंटना होऊ शकत नाही. कारण त्याचा वेग तुलनेने कमीआहे; मात्र ज्यांची ऑक्सिजन पातळी किमान 80टक्के आहे,अशा मध्यम स्वरूपाच्या कोविड रुग्णांसाठी कॉन्सन्ट्रेटर उपयोगी ठरू शकतो.
क्रेडपॉइंट्सद्वारे युझर्सना या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी दान करण्याची संधी दिली जाते. 10,000 क्रेड कॉइन्सद्वारे 1000 लिटर ऑक्सिजन, 25,000 क्रेड कॉइन्सद्वारे 2500 लिटर ऑक्सिजन, 50 हजार क्रेड कॉइन्सद्वारे 5000 लिटर ऑक्सिजन,तर एक लाख क्रेड कॉइन्सद्वारे 10हजार लिटर ऑक्सिजन देता येतो. आपल्याकडे किती क्रेड कॉइन्स आहेत हे पाहून Contribute या बटणावर टॅप केलं, की लगेच ते या कामासाठी वापरले जातात. क्रेडच्या माध्यमातून भरलेल्या क्रेडिट कार्ड बिलाच्या प्रत्येक रुपयामागे एक क्रेड कॉइन मिळतं. त्याचा वापर करण्यासाठी वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर्सही असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Oxygen supply