Home /News /lifestyle /

गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांचा घटता आकडा; तरीही दिलासा नाही, काय आहे चिंतेचं कारण?

गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांचा घटता आकडा; तरीही दिलासा नाही, काय आहे चिंतेचं कारण?

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17372 एवढी झालीय.

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17372 एवढी झालीय.

गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांचा (corona patient) संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हा दिलासा आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र रुग्णांच्या घटत्या आकड्यामागे नेमकं कारण काय आहे, समजून घ्या.

    मुंबई, 23 सप्टेंबर : गेले काही महिने भारतातील कोरोना रुग्णांचा (corona patient) आकडा वाढत होता. मात्र गेल्या आठवडाभरात वेगळं चित्र दिसून आलं. कोरोना रुग्णांची आकडेवारी घटू लागली आहे. फक्त आकडेवारी पाहिली तर कोरोना संक्रमण कमी होतं आहे, असं आपल्याला वाटेल आणि थोडा दिलासा मिळेल. मात्र खरंतर कोरोना रुग्णांची घटती संख्या हा दिलासा नाही तर चिंतेचं कारण आहे. देशाची आकडेवारी पाहता, 16 सप्टेंबर रोजी विक्रमी रुग्ण सापडल्यानंतर 17 सप्टेंबरपासून कोरोना रुग्णांचा वाढता आलेख घसरला. या दिवशी 96,793 रुग्ण सापडले. त्यानंतर 18 सप्टेंबरला 92,789, 19 सप्टेंबरला 92,755, 20 सप्टेंबरला 87,382, 21 सप्टेंबरला 74,493 आणि 22 सप्टेंबरला 80,391 रुग्णांची नोंद झाली. देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या महाराष्ट्रातही सलग पाच दिवस कमी अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली.  त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेस्टिंगचं प्रमाणही कमी झालं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशभरात टेस्टिंगची मर्यादा वाढल्याचं सांगितलं होतं. सध्या भारताची एका दिवसात 12 लाख जणांचं टेस्टिंग करण्याची क्षमता झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण भारतात साडेसहा कोटी नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. असं सांगितलं. हे वाचा - राज्यात कोरोनाचे 21 हजार नवीन रुग्ण, दिवसभरात 479 जणांचा मृत्यू मात्र गेल्या सात दिवसांमधील टेस्टिंगचं प्रमाण पाहता, तेदेखील कमी झाल्याचं चित्र आहे. 15 सप्टेंबरला 11,16,842, 16 सप्टेंबरला 11,36,613, 17 सप्टेंबरला 10,06,615, 18 सप्टेंबरला  8,81,911, 19 सप्टेंबरला 7,31,534 ,20 सप्टेंबरला 7,31,534 नमुन्यांची चाचणी झाली आणि त्यानंतर 21 सप्टेंबरला 9,33,185 आणि  22 सप्टेंबरला 9,53,683 नमुन्यांचं टेस्टिंग झालं. त्याचा परिणाम म्हणजे सात दिवस कमी झालेली कोरोना रुग्णांची आकडेवारी 23 सप्टेंबरला पुन्हा वाढली. ही संख्या 83,347 वर पोहोचली. महाराष्ट्रात चाचण्या वाढवण्याचे निर्देश महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सर्वाधिक प्रमाणात आहे. देशात आत्ता असलेल्या कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश उपचाराधीन रुग्ण (Active patients)महाराष्ट्रात आहेत. दैनंदिन रुग्णसंख्याही महाराष्ट्रात भीषण वेगाने वाढत आहे. याची दखल घेत आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र शासनाला कडक शब्दांत इशारा देण्यात आला आहे. हे वाचा - या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी, तरीही 7 दिवसांचा 'जनता कर्फ्यू' सर्व पाहण्या आणि अभ्यासांमधून सातत्याने चाचण्यांची संख्या वाढवा, असं सांगण्यात येत असलं, तरी दर दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या Covid test वाढवण्यात अद्याप महाराष्ट्र शासनाला यश आलेलं नाही. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली नाही, तर कोरोना मृत्यू वाढतील आणि साथ खरोखर आटोक्याबाहेर जाईल, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिवांनी दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या