नवी दिल्ली, 14 जुलै: मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetes) नियमितपणे रक्तातील साखर तपासणे महत्त्वाचे असते. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना नियमितपणे वारंवार रक्तातील साखरेची तपासणी (Blood Sugar Test) करण्याचा सल्ला देतात. शरीरातून रक्ताचा नमुना घेण्यापासून सुटका नसते. जेवढ्या वेळा तपासणी करायची असते तेवढ्या वेळा रुग्णाला रक्त द्यावे लागते. त्यासाठीच्या वेदना(Pains) सहन कराव्या लागतात. आता मात्र रुग्णांची या त्रासातून सुटका होणार आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी (Australian Scientists) रक्तातील साखर तपासण्यासाठी एक अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामध्ये रक्त शरीराबाहेर काढण्याची अजिबात गरज नाही. कोणतीही वेदना न होणारी ही चाचणी अतिशय स्वस्तात होते. सध्या याच्या क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) सुरू असून, त्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर सर्वत्र याचा वापर सुरू होईल. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रयोगशाळेत जाऊन रक्त देण्याची किंवा ग्लूकोमीटरमध्ये तपासणी करण्यासाठी वारंवार बोट टोचण्याची गरज भासणार नाही. ग्लूकोमीटरमध्ये तपासणी करताना सोबत दिलेल्या सुईने बोटाच्या टोकावर टोचून आलेलं रक्त मीटरमध्ये ठेवण्याच्या विशिष्ट पट्टीवर ठेवावे लागते. ती पट्टी मीटरमध्ये ठेवली जाते. याकरता किमान तीन वेळा ही प्रक्रिया करावी लागते. यामुळं अनेकदा वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळं अनेकदा रुग्ण ही तपासणी करणं टाळतात. त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो. COVID-19 Vaccine: लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात? आता ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या अनोख्या तंत्रज्ञानामुळे रक्तातील साखर तपासण्यासाठी रक्त काढणायची गरज पडणार नाही. तर तोंडातील लाळेच्या सहायानं ही मोजणी करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पॉल दस्तूर यांनी सांगितलं की, ‘यामध्ये एक पट्टी आहे. या पट्टीवर काही एंझाइम लावलेले आहेत. ही पट्टी तोंडात ठेवायची आहे. त्यामुळं तोंडातील लाळ या पट्टीला लागेल. लाळेत ग्लुकोज असते. मग ती पट्टी एका ट्रान्झिस्टरमध्ये ठेवली जाते. हे मशीन शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण सांगेल. या चाचणीची अचूकताही अधिक आहे.’ ‘प्रमाणित ग्लूकोज चाचणीपेक्षा 100 पट जास्त संवेदनशीलता असणारी एक पद्धत आम्हाला तयार करायची होती. तसंच ती कमी खर्चाची, सोपी असावी असा आमचा प्रयत्न होता. ट्रान्झिस्टरमध्ये शाईचा वापर केल्यानं खर्च कमी करणं शक्य झालं आहे. या तंत्राद्वारे कोविड-19(Covid-19)) सह अॅलर्जेन, हार्मोन्स आणि कर्करोगाची तपासणीही करणं शक्य होईल,’ असंही प्रोफेसर पॉल दस्तूर यांनी सांगितलं. डास नेमके मलाच का चावतात? ठराविक व्यक्तींनाच जास्त चावण्यामागे हे आहे विज्ञान मधुमेही रुग्णांसाठी ही तपासणी पद्धत अतिशय लाभदायी ठरणार असून, रुग्ण आता चाचणी करण्यास टाळाटाळ करणार नाहीत. त्यामुळे वेळीच उपचार करणंही शक्य होईल. हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीकारी ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.