मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाचा शरीराप्रमाणे मनावरही झाला परिणाम; सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातील संशोधकांनी दाखवली दुसरी बाजू

कोरोनाचा शरीराप्रमाणे मनावरही झाला परिणाम; सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातील संशोधकांनी दाखवली दुसरी बाजू

कोरोनामुळे आपल्या व्यक्तिगत, सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आले. त्यांना आज ‘न्यू नॉर्मल’ अर्थात नवसामान्य परिस्थिती असे संबोधले जात आहे. आणि याचाच अभ्यास करण्यात आला आहे.

कोरोनामुळे आपल्या व्यक्तिगत, सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आले. त्यांना आज ‘न्यू नॉर्मल’ अर्थात नवसामान्य परिस्थिती असे संबोधले जात आहे. आणि याचाच अभ्यास करण्यात आला आहे.

कोरोनामुळे आपल्या व्यक्तिगत, सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आले. त्यांना आज ‘न्यू नॉर्मल’ अर्थात नवसामान्य परिस्थिती असे संबोधले जात आहे. आणि याचाच अभ्यास करण्यात आला आहे.

  • Published by:  Priya Lad

पुणे, 29 मार्च : फक्त राज्यातील (Coronavirus in mahahrashtra) नव्हे तर देशातील सर्वाधिक कोरोना (Coronavirus in India) रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर पुणेच (Coronavirus in Pune) आहे. पुण्यातच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि मधले काही महिने दिलासा मिळाल्यानंतर पुण्यात आता कोरोना पुन्हा नियंत्रणाबाहेर गेला आहे. दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर असो किंवा राज्य आणि देश दररोज कोरोनामुळे काय दुष्परिणाम (Coronavirus side effect) झाले हेच आपण पाहत आलो. पण जसं एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच कोरोनाच्या महासाथीचीही दुसरी बाजू (World after corona) आहे. कोरोनाचे जसे दुष्परिणाम तसे चांगले परिणामही (Coronavirus Good effect) पाहायला मिळाले आहेत.

कोविड-19 महासाथीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला प्रभावित केलं. यामुळे जगभरातील मानवी जीवनाचे अपरिमित नुकसान झालं. मानवी जीवन, सार्वजनिक आरोग्य, अन्न आणि जगाच्या कार्य करण्याच्या पद्धतीपुढे कोरोनाने अभूतपूर्व आव्हान उभं केलं. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत, सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आले. त्यांना आज ‘न्यू नॉर्मल’ अर्थात नवसामान्य परिस्थिती म्हटलं जातं.  लोकांची वृत्ती, खरेदीसंबंधी वर्तन, व्यक्तिगत वर्तन यांचा यातून अभ्यास करण्यात आला आहे.

हे वाचा - 'Lockdown ची तयारी करा', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश

पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या डॉ. अरकेरी शांता व्ही आणि हेल्थकेअर आणि फार्मा कम्युनिकेशनच्या  दीप्ती केंजळे खोपकर यांनी कोरोना महासाथील नागरिकांच्या वर्तनात आणि सवयीत नेमके काय काय बदल झाले याचा अभ्यास केला.  कोविड-19 सारख्या अभूतपूर्व परिस्थितील तोंड देताना लोकांच्या वर्तनातील बदल अर्थात त्यांची वृत्ती, खरेदीच्या सवयी, वैयक्तित दिनक्रमातील बदल कसा होता हे समजून घेणे या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली होती.

वर्तनात काय बदल झाला?

कोरोनामुळे माणसातील मेलेली माणुसकी जागी झाली. अधिकाधिक मदतीचे हात पुढे येऊ लागले. 38.6% लोकांनी आपण अधिक मदतकारक झाल्याचं वाटलं. माणूस समाजाभिमुख असल्याने अशा परिस्थितीत वृत्ती मदतकारक बनणे स्वाभाविक मानले पाहिजे. याशिवाय  6.४% लोकं सभ्य आणि 18.6% लोकांमध्ये सहानुभूतीशीलता आली. तर कोरोनाने 22.1% लोकांच्या मनात भीतीने घर केलं.

खरेदीत काय बदल झाला?

हातात पैसा असला की शॉपिंग आलीच. गरजांशिवाय आवडी, इच्छाही लोक राखू लागले. पण कोरोना काळात गरजांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं. कोविड-19 मुळे अनेकांच्या मनांत भीतीची दहशत, तर वेतन कपात, काम नाही आणि पगार नाही अशी अनेकांची अवस्था बनवली. त्याने घडविलेला हा परिणाम प्रचंड मोठा आहे. जवळपास 58 टक्के लोकांनी त्यांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आणि केवळ गरजांवर केंद्रीतच खरेदी केली. केवळ 1.4 टक्के लोकांनी या काळात इच्छांवर केंद्रीत खरेदी केली.  गरज आणि इच्छा या दोहोंचा मिलाफ साधणे 30.3% लोकांना शक्य झाले. या अभूतपूर्व परिस्थितीत खरेदीविषयक वर्तनात काहीही बदल झाला नाही अशांचे प्रमाण 10.6% इतके होते.

खरेदीसमयी निवडीचा कल

कोविड-19 परिस्थितीने लोकांचा कल स्थानिक वस्तूंच्या खरेदीला पसंती देणारा बनवला. कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान, इतर काही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आणि / किंवा सुलभतेमुळे बऱ्याच जणांनी स्थानिक विक्रेते आणि स्थानिक किराणा आणि वाणसामानाच्या दुकानांना खरेदीसाठी पसंती दिल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्होकल से लोकल’ मोहिमेची याच काळात घोषणा केली होती. या मोहिमेने लोकांच्या वर्तनावर प्रभाव पाडला की नाही हे माहित नाही, परंतु एकंदरीत कोविड -19 परिस्थितीमुळे, 71.8% लोकांनी त्यांचे खरेदीचे वर्तन स्थानिक पसंतीकडे झुकल्याचे स्पष्ट केले.

बचतीच्या सवयीत बदल

बर्‍याच वेळा, लोक पैसे वाचवण्यास सक्षम नसतात. कारण त्यांचे त्यांच्या खर्चावर नियंत्रण नसते. कमी खर्च करण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षिततेचे उद्दिष्ट ठेऊन बचतीची सवय अंगी बाणवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या 68.9 टक्के लोकांनी, कोविड-19 परिस्थितीत त्यांच्या बचतीच्या सवयीत सुधारणा झाल्याचे नमूद केले, तर 7.1 टक्के लोकांनी या परिस्थितीने त्यांच्या बचतीच्या सवयीत बिघाड घडविल्याचे मत नोंदविले. कोविड-19 संकटाने लोकांपुढे त्यांच्या नोकरी / पेशा, तसेच वेतन / मिळकत अशा अनेक प्रकारच्या अनिश्चितता उभ्या केल्या, ज्यामुळे बचतीचे महत्व त्यांच्या लक्षात येऊ शकले.

दैनंदिन व्यक्तिगत कार्यात बदल

कोविड -19 परिस्थितीने सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या 55.6% टक्के लोकांना अधिक काम करण्यास प्रवृत्त केल्याचे सांगितले, तर सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या 44 टक्के लोकांचा कोविड-19 परिस्थितीत व्यायामाकडील कल कमी झाला आणि 25.5 टक्के लोकांनी त्यांची झोप तर 8.5 टक्के लोकांनी त्यांचं खाण  कमी झाल्याचं त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा वापर मात्र फार बदलला नाही, तो जवळपास आहे त्या स्थितीतच राहिला.

अतिरिक्त नवीन सवयी

या काळात नवीन सवयी/ कौशल्य शिकून घेतले असे 64.1% लोकांनी सांगितले. 35.9% लोकांना कोविड-19 परिस्थितीत नवीन सवय जडल्याचे अथवा नवीन काही शिकल्याचे वाटत नाही.

वर्तनातील बदलाचे स्वरूप कसे?

वर्तनातील बदलाच्या प्रक्रियेला चिकाटीची जोड हवी, वर्तनविषयक अभ्यास हवा आणि स्वभावात लवचिकता हवी. जवळपास 20% लोकांना वाटते की, कोविड-19 मुळे त्यांच्या वर्तनात घडून आलेला बदल हा कायमस्वरूपी आहे, त्या उलट 21% लोकांनी हा बदल तात्पुरता असल्याचे सांगितले. तब्बल 59.2% लोकांना वर्तनातील हा बदल स्थायी स्वरूपाचा की तात्पुरता हे सांगता येऊ शकले नाही.

हे वाचा - मुंबईत कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक पश्चिम उपनगरात; हा भाग ठरतोय मोठा हॉटस्पॉट

एकंदरच काय तर जागतिक स्तरावर, कोविड-१९ परिस्थितीने अनेक अभूतपूर्व अशा उलथापालथी घडविल्या आहेत. या काळात लोकांचा स्वभाव अधिक मदतकारक बनला आणि ते आपल्या इच्छांपेक्षा नेमक्या गरजा भागवण्यापुरताच विचार करू लागले.

कोविड-१९ परिस्थितीत लोकांचा बचतीकडील कल वाढला. या काळाचा त्यांनी नवीन सवयी / कसब-कौशल्य शिकून घेण्यासाठी वापर केला. सर्वेक्षणात जवळपसा 143 लोकांनी आपला प्रतिसाद दिलेला आहे. विविध संशोधनाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

First published:

Tags: Coronavirus, World After Corona