मुंबई, 29 मार्च : राज्यात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मुंबईतही कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. मुंबईत रविवारी जवळपास 7000 रुग्णांची नोंद झाली असून जी मुंबईसारख्या गर्दीच्या शहराची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभागं ही पश्चिम उपनगरातली आहेत. आणि दर आठवड्याला याच वॉर्डातील कोरोना रुग्णांची दरवाढ वर-खाली होत आहे. त्याच बरोबर दर आठवड्याला रुग्ण वाढीचा दरही अनेक प्रभागात जवळपास तीन पटीने वाढला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व असे अनेक हॉटस्पॉट बघायला मिळतात. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण अनेक प्रभागात वाढले आहेत.
हे ही वाचा-एका तासात आवरायचं अन्यथा; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक पोलिसांचा नवा फंडा
दरम्यान नाशिकमध्ये गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने नवीन फंडा काढला आहे. रस्त्यावर फिरायचंय? बाजारपेठेत काम आहे? मॉल मध्ये जायचंय? बाजारसमितीत काम आहे? यासाठी फक्त एका तासाची परवानगी देण्यात आली आहे. या तासाभरासाठी कोणत्याही व्यक्तीला आता 5 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. एका तासात काम आटोपून घरी जा नाहीतर 500 रुपये दंड भरा, असा नवा फंडा करण्यात आला आहे. पालिका आणि पोलीस यांचा नवा नियम लागू केला आहे. सर्व प्रमुख रस्ते, बाजारपेठ, मार्केट मॉल यांच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचं बॅरीकेट लावण्यात आलं आहे. वाढणारी गर्दी रोखण्यासाठी हे सशुल्क बंधनकारक असणार आहे.
प्रभाग - रुग्णवाढीचा दर - 7 दिवसांत वाढलेली संख्या
बांद्रा पश्चिम - 1.78% / 1763 रुग्ण
गोरेगाव - 1.69% / 1825 रुग्ण
चेंबूर पश्चिम - 1.68% / 1435 रुग्ण
अंधेरी पश्चिम - 1.52% / 2795 रुग्ण
अंधेरी पूर्व - 1.50% / 2353 रुग्ण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona updates, Mumbai